वाबळेवाडी शाळेवर कारवाईची मागणी करणाऱ्या त्या तीन झेडपी सदस्या कोण?

न्यायालयीन लढाईसाठीही ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली आहे.
Wablewadi school
Wablewadi schoolSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शाळेसंदर्भात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचे मूळ अखेर नागरिकांच्या हाती लागले आहे. या शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तीन महिला सदस्यांच्या भाषणांची क्लिप ग्रामस्थांना मिळाली आहे. प्रशासनाकडून कायम प्रोत्साहन असलेल्या या शाळेवर कारवाईसाठी काही राजकीय पदाधिकारी आमच्यावर कसा दबाव आणतात, असा प्रश्न काही अधिकाऱ्यांनी या क्लिपचा हवाला देत उपस्थित केला आहे. (Who are the three women ZP members demanded action against Wablewadi school?)

झोकून देऊन काम करणारे शिक्षक पाहून वाबळेवाडी ग्रामस्थांनी सुमारे सात एकर जागा मोफत दिली. शाळेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली. त्याचबरोबर शैक्षणिकसह इतर उपक्रम शिकविणाऱ्या जिल्हा परिषदेचे सोडून इतर १० शिक्षकांचे पगारही ग्रामस्थांकडून दिला जातो. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. पण, पुणे जिल्हा परिषदेकडून शाळेला गेल्या आठ वर्षांत सुविधा म्हणून काय दिलं, असा प्रश्न या क्लिपनंतर ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

Wablewadi school
अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

वाबळेवाडी शाळेसंबंधी चौकशी करूनही त्याचा अहवाल प्रसिद्ध केला जात नसल्याबद्दल शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) गावातील १२५ महिलांसह २५० जणांनी जिल्हा परिषदेत धडक दिली होती. त्यावेळी या क्लिपबाबतचा खुलासा झाला आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर या संपूर्ण प्रकरणाबाबत चुकीची चौकशी पद्धती वापरल्याचा आरोप करून याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी केल्याची माहिती अध्यक्षा सुरेखा वाबळे यांनी दिली. न्यायालयीन लढाईसाठीही ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केल्याचे त्यांनी सांगितले.

Wablewadi school
इथून परत जाणं एवढं सोपं नाही! राणेंचा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर इशारा

वाबळेवाडीचे ग्रामस्थ काल शाळेसंदर्भातील चौकशीबाबत महिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आले होते, त्यावेळी संबंधित व्हिडीओ क्लिप दाखवत आमच्यावर कसा दबाव आणला जात असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पैशाची कुठलीही अफरातफर नाही. पण, हिशेब ठेवण्याच्या पद्धतीमध्ये अनियमितता दिसत असल्याचे सांगण्यात आले. पण त्याबाबत जिल्हा परिषदेकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने ती अनियमितता वाटत असावी, असे बोलले जात आहे.

त्यांनी शाळेबाबतची भूमिका जाहीर करावी

ज्यांना वाबळेवाडी शाळेबद्दल प्रेम नाही, ज्यांनी कधीही शाळेत येऊन पाहणी केली नाही किंवा शाळेला कसलीही मदत केली नाही, अशा राजकीय पदाधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्याबद्दल वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून या पदाधिकाऱ्यांनी शाळेबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी झेडपीत आलेल्या महिलांनी केली आहे.

पतीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून सुरेखाताईंचा शाळेसाठी लढा

स्वत:च्या दोन किडन्या निकामी होऊनही शाळेच्या प्रत्येक कामासाठी अहोरात्र झटलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाबळे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शाळेवर आलेल्या संकटासाठी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून सचिन यांच्या पत्नी सुरेखा बावळे या ग्रामस्थांच्या आग्रहाखातर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपुढे वाबळेवाडीतील महिलांच्या वतीने शाळेपुढे जी बाजू मांडली, ती कमालाची प्रभावाची ठरल्याची माहिती आंदोलक महिलांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com