झेडपी कर्मचाऱ्याच्या बदल्यांना दोन वर्षानंतर मुहूर्त!

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे.
Government Office
Government OfficeSarkarnama

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या येत्या ३१ मे अखेरपर्यंत करण्याचा राज्य सरकारचा (State Government) मानस आहे. कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या या बदल्या यंदा होणार आहेत. यामध्ये प्रशासकीय आणि विनंती अशा पद्धतींच्या बदल्या असणार आहेत. या दोन्ही प्रकारात संवर्गनिहाय एकूण कर्मचारी संख्येपैकी दहा टक्के बदल्या केल्या जाणार आहेत. यामुळे येत्या १ मेपासून जिल्हा परिषदेत बदल्यांचा मोसम सुरु होणार आहे.

Government Office
'सदाभाऊंची स्थिती भाजपच्या फडात तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी'

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि केंद्रप्रमुखांच्या बदल्या करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून, उर्वरित संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होणे बाकी असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता.२६ एप्रिल) सांगितले.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात किंवा पंचायत समिती मुख्यालयात किमान १० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता क्रमानुसार या बदल्या केल्या जाणार आहेत. विभागनिहाय आणि कर्मचारी संख्यानिहाय एकूण कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार आहे. यानुसार येत्या १ मेपासून ही बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.

Government Office
मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

राज्य सरकारने या बदल्यांसाठी ३१ मे ही अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे या तारखेपूर्वीच पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे बंधन जिल्हा परिषदेवर आहे. दरम्यान, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या वास्तव सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व पंचायत समित्यांच्या गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे.

शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार असली तरी, यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश नाही. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आॅनलाइन केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश नाही. शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र बदली प्रक्रिया असेल, असे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in