ये रे माझ्या मागल्या... पुन्हा सरळ सेवेची पदे कंपन्यांकडूनच भरणार

गट ब, गट क, गट ड ही पदे कंपन्यांच्या माध्यमातून भरली जाणार...
EXAM Studant
EXAM Studant Sarkarnama

Cabinet Decision News : आता राज्यातील पदभरतीच्या परीक्षा ह्या आयबीपीएस, टीसीएस, आयओएन या कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र सरळ सेवेची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. पण तरी देखील राज्य सरकारने पुन्हा एकदा सरळ सेवेची पदे कंपन्यांकडूनच भरण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पदभरतीच्या परीक्षा ह्या आयबीपीएस, टीसीएस, आयओएन या कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आता गट ब, गट क, गट ड ही पदे या कंपन्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. मात्र यामध्ये लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पदे असणार आहेत.

EXAM Studant
..तर बाबासाहेबांच्या 'त्या' पुतळ्याला माझा विरोध असेल; आनंदराज आंबेडकर

सरळ सेवेची पदे कंपन्यांच्या माध्यमातून भरण्याच्या निर्णयामुळे भरती प्रक्रिया लवकर होईल. मात्र ही भरती पारदर्शकपणे पार पडणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण या आधीही आरोग्य भरती, म्हाडाच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पदभरतीची सर्वच पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. पण तरी देखील राज्य सरकारने पुन्हा एकदा सरळ सेवेची पदे कंपन्यांकडूनंच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ये रे माझ्या मागल्या... अशी गत झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in