PMRDA चे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली; वर्धा, नागपूर येथे नवीन जिल्हाधिकारी

Eknath Shinde Govt : वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू
Mantralay
Mantralaysarkarnama

पुणे : राज्य सरकारने पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या असून पुण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पुणे महानगर प्राधिकरणाच्या आयुक्तपदी राहुल रंजन महिवाल (Rahul Mahiwal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त सुहास दिवसे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही. महिवाल हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2005 मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते.

दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला.

Mantralay
Nanded : हेमंत पाटील, जाधव यांनी शिवसेना अशोक चव्हाणांना विकली..

नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला (Vimala R.) यांना महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांना नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. मुंबई महानगर प्राधिकरणाणे सहआयुक्त राहुल कर्डिले यांना वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तेथील विद्यमान जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनाही नियुक्तीविना ठेवण्यात आले आहे. तसेच नांदेडचेही जिल्हाधिकारी पद या बदल्यानंतर रिक्त राहिले आहे.

Mantralay
हरिहरेश्वर येथे आढळली संशयास्पद बोट; पोलिसांनी जारी केला हाय अलर्ट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in