ठाकरे सरकारचा दणका! परमबीरसिंहांसोबत आणखी एक आयपीएस निलंबित

परमबीरसिंह यांच्यासह आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करून सरकारने दणका दिला आहे.
Parag Manere
Parag ManereSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांना राज्य सरकारशी पंगा घेणे अखेर महागात पडले आहे. त्यांना निलंबित करून सरकारने दणका दिला आहे. बेशिस्त आणि अनियमिततेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परमबीरसिंह यांच्यासोबत आयपीएस अधिकारी पराग माणेरे (Parag Manere) यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

परमबीरसिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. अखेर ते 25 नोव्हेंबरला मुंबईत परतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने केली होती. याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दुजोरा दिला होता. पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य असलेली कारवाई परमबीरसिंह यांच्यावर केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले होते. अखेर परमबीरसिंह यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे. परमबीरसिंह यांच्या निलंबनाचा आदेश गृह मंत्रालयाने काढला आहे. याचबरोबर पोलीस उपायुक्त पराग माणेरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. ते आधी ठाण्यात नियुक्तीस होते. त्यांचाही परमबीरसिंह यांच्यासह खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग समोर आला होता.

परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने हे वॉरंट रद्द करून परमबीरसिंह यांना दिलासा दिला होता. त्याचवेळी ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासही बजावले आहे.

Parag Manere
पवारांच्या भेटीनंतर ममतांची काँग्रेस वगळून आघाडी अन् वेणूगोपाल म्हणाले, शक्यच नाही!

परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर हजर राहण्यास टाळाटाळ करणारे परमबीरसिंह अखेर हजर झाले. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून या सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे. याचबरोबर समितीने परमबीरसिंहांच्या विरोधात काढलेले अटक वॉरंट रद्द केले आहे.

Parag Manere
भाजपचा दे धक्का! पंजाबमध्ये अकाली दलाचा बडा नेता गळाला

परमबीरसिंह यांनी त्यांच्या वकिलामार्फत समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com