शिंदे सरकारचा अजब कारभार! १२ किलोमीटरच्या अंतरात नियुक्ती द्यायला लागले ८० दिवस

Pune Municipal Corporation : अधिकाऱ्याला बदलीनंतर तब्बल पावणेतीन महिन्यांनी मिळाली पोस्टिंग
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis Sarkarnama

Pune Municipal Corporation : राज्यात सत्ताबदल होताच नव्या सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या केल्या. त्यातही आयपीएसच्या बदल्यांत मोठा घोळ नंतर दिसून आला. कारण त्यातील अनेक अधिकाऱ्यांना २२ दिवसांपर्यंत नियुक्ती देण्यात आली नव्हती. आता हा घोळ मुलकी अधिकाऱ्यांच्या बदल्यातही दिसून आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना बदलीनंतर तब्बल ८० दिवसांनी काल पुण्यात पोस्टिंग देण्यात आली.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांची पिंपरीतून १३ सप्टेंबरलाच बदली झाली होती. पण, अद्याप त्यांना नियुक्तीच देण्यात आली नव्हती. त्यामुळे या ८० दिवसांचा पगार काम न करताही सरकारला द्यावा लागणार आहे. त्यांची प्रतिनियुक्तीवर पहिली नियुक्ती पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून १२ फेब्रुवारी २०२१ रोजी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यात सत्तेत असताना झाली होती.

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Shivsena : ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या ; आता दोन बड्या नेत्यांना अँटी करप्शनची नोटीस!

मात्र, राज्यात सत्तापालट होताच शिंदे-फडणवीसांच्या नव्या सरकारने आगामी महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन आपल्या सोईच्या पोलिस आणि महसुली अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र आरंभले. त्यात पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची १६ ऑगस्ट, तर त्यांच्याशी गुळपीट जमलेले ढाकणे यांची नंतरच्या महिन्यात १३ तारखेला बदली करण्यात आली होती. पाटील यांची मुंबईत (Mumbai) बदली झाली होती. पण, त्यांना पुण्यात ती हवी होती. म्हणून काही दिवस थांबून त्यांनी ती पुण्यात झाल्यावरच ते रुजू झाले होते. आता त्यांच्यानंतर ढाकणे यांचीही पुण्यातच काल बदली झाली. काल त्यांच्या बदलीचा आदेश निघाला अन् कालच त्यांनी पदभारही स्वीकारला.

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Congress : "पेशवाईसोबत राहायचे की शिवशाहीसोबत हे मुख्यमंत्री शिंदेंनी ठरवावे!"

दरम्यान, ढाकणे यांच्या नियुक्तीने पिंपरी पालिकेसारखाच पेच तथा स्थानिक पालिका अधिकाऱ्यांवर पुणे पालिकेतही अन्याय झाला आहे. पालिकेच्या आकृतीबंधाप्रमाणे पिंपरी पालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत. त्यातील दोन राज्य सरकारी, तर एक पालिका सेवेतील अधिकाऱ्यातून भरले जाते. पण, पालिका सेवेतील अधिकारी त्यासाठी पात्र नसल्याचा अहवाल देत पिंपरी पालिका आय़ुक्त शेखरसिंह यांनी तिन्ही ठिकाणी सरकारी सेवेतील अधिकारी आणले आहेत.

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
राज ठाकरेंच्या सभेला अल्प प्रतिसाद; खुर्च्या उचलण्याची वेळ : पत्रकारांनाही सभागृहाबाहेर काढले

सातारा (Satara) जिल्हाधिकारी पदावरून पिंपरी पालिका आयुक्त म्हणून आलेल्या शेखरसिंह यांच्याशी मेतकूट असलेले साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांचीही पिंपरीत अतिरिक्त पालिका आयुक्त म्हणून नुकतीच बदली झाली. मात्र, नगरविकास विभागावर कुरघोडी करीत महसूल विभागाने त्यांच्या बदलीचा आदेश काढल्याने त्याची चर्चा झाली. परिणामी ही बदली होल्ड केली गेली. दुसरीकडे ढाकणे यांच्या नियुक्तीने पुणे पालिकेतही पिंपरी पालिकेसारखी स्थिती झाली आहे. तेथेही सर्व अतिरिक्त आयुक्त हे सरकारी सेवेतील अधिकारी झाले आहेत. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in