उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरात खडखडाट पाहून चोरटे वैतागले अन् थेट चिठ्ठी लिहिली!

विशेष म्हणजे चोरट्यांनी या चिट्ठीवर आपल्या सह्याही केल्या आहेत. ही चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरात खडखडाट पाहून चोरटे वैतागले अन् थेट चिठ्ठी लिहिली!
Robbery at Deputy Collectos House.

देवास : उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मागील पंधरा दिवसांपासून कुलूपबंद असलेल्या घरात चोरटे मोठ्या धाडसाने घुसले. पण त्यांचा तिथं भ्रमनिरास झाला. घरात अपेक्षित पैसे न मिळाल्यानं त्यांनी त्यांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना चिठ्ठी लिहून ठेवली. कलेक्टर, पैसे नव्हते तर घर लॉकही करायला नको होते, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी या चिठ्ठीवर आपल्या सह्याही केल्या आहेत. ही चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौड (Deputy Collector Trilochan Gaur) यांच्या घरी हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी घरी चोरी झाल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Robbery at Deputy Collectos House.
भाजपला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याचा आमदार मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश

सुमारे तीस हजार रुपये रोख आणि काही दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. गौड हे खाटेगांव ब्लॉकचे उपजिल्हाधिकारी असून त्यांच्या पत्नी रतलामच्या जिल्हाधिकारी आहे. देवासमधील त्यांचं घर असून दोघेही आठवड्यातून केवळ एकदाच या घरी जातात.

गौड पती-पत्नी 20 सप्टेंबर रोजी त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर ते नऊ ऑक्टोबर रोजी पुन्हा घरी परतले. त्यावेळी त्यांना घरी चोरी झाल्याचे आढळून आले. घराचे कुलूप तोडण्यात आले होते. घरात गेल्यानंतर त्यांना 30 हजार रुपये व काही दागिने चोरीला गेल्याचे दिसले. तसेच एक चिठ्ठीही आढळून आली. चोरट्यांनीच हे चिट्ठी लिहिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सरकारी नोट पॅडचाच वापर केला होता.

Robbery at Deputy Collectos House.
अखेर केंद्रीय मंत्र्यांनी विरोधी पक्षातील भावाला फोडत भाजपमध्ये आणलंच!

घरामध्ये सर्वत्र साहित्य विखरलेले होते. चोरट्यांना घरात अपेक्षित रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी चिठ्ठी लिहित उपजिल्हाधिकाऱ्यांनाच सल्ला दिला. घरात पैसे नव्हते तर लॉकही करायला नको होते, असे त्यांनी लिहिले आहे. तसेच चोरट्यांनी त्यावर सह्याही केल्या आहेत. त्यातील एका चोरट्याने आपलं नाव गुणवंत देव असंही लिहिलं आहे. ही चिठ्ठी सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in