आघाडीने साईडलाईन केलेल्या भारतींवर फडणवीसांनी दिली मोठी जबाबदारी; शुक्लाही येणार होत्या पण...

IPS Deven Bharti News : देवेन भारतींसाठी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती
Devendra Fadnavis, Deven Bharti, Rashmi Shukla
Devendra Fadnavis, Deven Bharti, Rashmi ShuklaSarkarnama

IPS Deven Bharti News : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती (Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईसाठी फक्त पोलीस आयुक्त हेच पद होते. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात साईडलाईन असलेल्या भारती यांना मोठी जबाबदारी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे पुनर्वसन केल्याची चर्चा आहे.

भारती यांच्या प्रमाणेच पुण्याच्या माजी पोलीस (Police) आयुक्त रश्मी शुक्ला यांना अँटीकरप्शन विभागामध्ये मुंबईच्या सीपी किंवा डीजी म्हणून परत आणण्याचा प्रस्ताव होता, अशी चर्चा होती. कारण डिसेंबरमध्ये रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पद रिक्त होते. त्यानंतर विशेष मुंबई पोलीस आयुक्त म्हणून भारती यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार आज (ता. ४) भारती यांच्या नियुक्तीची घोषणा झाली.

Devendra Fadnavis, Deven Bharti, Rashmi Shukla
Uddhav Thackeray, Eknath Shinde News : आंबेडकर-ठाकरेंची चर्चाच; शिंदेंनी टायमिंग साधले!

मात्र, शुक्ला यांची नियुक्ती होऊ शकली नाही. कारण फोन-टॅपिंग प्रकरणामध्ये कथित भूमिकेबद्दल शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे शुक्ला यांना मुंबईत परत आणण्याच्या हालचाली थांबवण्यात आल्या. मात्र, भारती यांची नियुक्ती झाली.

भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारती हे 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा भारती यांच्यावर सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) जबाबदारी होती. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले होते.

Devendra Fadnavis, Deven Bharti, Rashmi Shukla
Sai Resort Case : ईडीकडून १० कोटींची संपत्ती जप्त : परब म्हणतात, 'माझा काही संबंध नाही..'

मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरुन भारती यांना हटवण्यात आले. त्यानंतर भारती हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. भारती फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व गृह खाते फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात गृह खात्यावर आपले पूर्ण नियंत्रण आणण्यासाठी फडणवीसांनी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यातूनच भारती यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com