DCP- 25 हजार, PI- 85 हजार, PSI-1500 : पोलिसांच्या हप्त्याची पोलखोल!

ठाणे (Thane) शहरातील एका हाॅटेलचालकाने पोलिसांच्या हप्तेबाजीविषयी सविस्तरपणे जाहीर सांगितले.
Thane Police & Manpada Police
Thane Police & Manpada PoliceSarkarnama

पुणे : ठाणे येथील मानपाडा पोलिस (Thane Police) हद्दातील एका ऑर्केस्ट्रा बार हॅाटेल मालकाने मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बार चालू ठेवण्यासाठी परिसरातील पोलिसांकडून महिन्याला हप्ते वसूल केले जात असल्याचा गौप्यस्फोट संबंधीत हॅाटेल मालकाने माध्यमांशी बोलतांना केला आहे.

Thane Police & Manpada Police
PNB Scam : फरार मेहुल चोक्सीला अपहरणाची भीती!

मानपाडा येथील कल्याण शील रोडवरील एका ऑर्केस्ट्रा बारच्या मालकाने (orchestra Bar Owner) पोलिसांना हप्ता दिला नाही म्हणून त्यांच्या डान्सबारवर रात्रीला छापा टाकण्यात आला व शिविगाळ करून मारहाण करत गल्ल्यातील पैसे, साऊंड सिस्टम आणि बार मधिल सामान पोलिसांनी नेल्याचा आरोप मानपाडा पोलिसांवर केला आहे.

संबंधीत डान्सबार मालकाच्या म्हणण्यानुसार परिसरात सुमारे 25 डान्सबार चालतात. मात्र, सर्व हप्ते देऊन चालू आहेत. आम्ही कुणा कुणाला हप्ते द्यावे? हप्ते देण्यास नकार दिल्यास डान्सबारवर छापा टाकण्यात येतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हप्ते सर्वच अधिकारी घेतात. मात्र नवीन अधिकारी आल्यावर जादा पैसे मागितले जातात.

या परिसरात चायनिज गाड्यावाल्याकडून सुद्धा पोलीस हप्ते घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस दुसऱ्याही बारवर छापा टाकतात मात्र, सेटिंग्ज केली जाते. माझ्याकडे जेव्हा हप्ता मागितला तेव्हा मला त्यांची अपेक्षा पूर्ण करता आली नाही. यामुळे त्यांनी ही कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला.

माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यास काही हरकत नाही. मात्र, त्यांनी शिविगाळ व मारहाण का केली, असा सवाल त्यांनी केला आहे. डान्सबारच्या भिंतीवरून आत येवून त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यावेळी माझ्या डान्सबारमध्ये 4 मुली होत्या त्यांना पोलिसांनी घेऊन गेले. त्यावेळी महिला पोलीस नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Thane Police & Manpada Police
आफ्रिकेतून हजार जण मुंबईत; आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

परिसरातील डान्सबार मालकांकडून प्रतिमहा सहायक आयूक्तांपासून ते वसूलीला येणाऱ्या शिपायाला सुद्धा हप्ते दिले जातात. सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची हप्ते ठरलेले आहेत. यामध्ये सह-पोलीस आयुक्त, उपायूक्त 25 हजार, सहायक पोलीस आयूक्त व मानपाड्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला 85 हजार रूपये द्यावे लागतात. या सर्वांना एकूण 4 लाख 80 हजारापर्यंत हप्ता द्यावा लागत असल्याचे, त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे धंदा होत नसल्याने पोलिसांना हप्ते कुठून द्यायचे असा प्रश्न विचारत त्यांनी माध्यमासमोर आपली कैफीयत मांडली. या हप्तेवसुली संदर्भात या आर्केस्ट्रा मालकाने काही पोलिस अधिकाऱ्यांचे नावही घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी ठाणे पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com