MPSC चा मोठा निर्णय; आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार...

पूर्वीप्रमाणे उमेदवारांना प्रवर्गानुसार निश्चित वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
MPSC Exam
MPSC ExamSarkarnama

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC)पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षेच्या संधींबाबत फेरबदल करण्यात आला आहे. उमेदवारांना मिळणाऱ्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीकडून (ता.15 जून) घेण्यात आला आहे. यामुळे आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. (MPSC Exam Latest Marathi News)

MPSC Exam
शरद पवार निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहणार; राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचा नवा चेहरा

राज्यात एमपीएससीच्या माध्यमतून शासकीय पदांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस ही एमपीएससीकडून शासनाला करण्यात येते. 2020 पर्यंत एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देता येत होती मात्र, निवड प्रक्रियेत सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल 6 संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी 2020 मध्ये निश्चित केल्या होत्या तर, अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएसीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र आता या निर्णयाबाबत फेरबदल करण्यात आला असून संधीच्या मर्यादा रद्द करण्यात आल्याची घोषणा एमपीएससीकडून आज करण्यात आली आहे. यामुळे आता एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आपल्या प्रवर्गाच्या वयाच्या अटीनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.

MPSC Exam
अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' : आदित्य ठाकरेंकडून २ वर्षांपूर्वीच्या शिळ्या कढीला ऊत

दरम्यान, पदभरतीवरील निर्बंधांमुळे उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या कमी संधी आणि उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी एमपीएसीकडून सर्वांगीण विचार करून उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादेनुसार संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एमपीएसीकडून सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com