सरळसेवा भरती खासगी कंपन्यांकडून नको; युवक राष्ट्रवादीची पवारांकडे मागणी

पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सरळसेवा भरती प्रकरणी सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
Sharad Pawar, Ravikant Varpe
Sharad Pawar, Ravikant VarpeSarkarnama

पुणे : महाराष्ट्र शासनाची सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया ही IBPS,MKCL,TCS मार्फत घेण्यात यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन आज (ता.8 मे) रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी पवारांना केले आहे.

दरम्यान सरळसेवा भरतीची प्रक्रियेतील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, आयोगाच्या खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवला आहे जात आहे. राज्यातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया ही खाजगी कंपन्यांद्वारे घेऊ नये, युवक राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यावर पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन सरळसेवा भरती प्रकरणी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन दिेल्याचे वरपे यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar, Ravikant Varpe
MPSC : मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी ‘सीसॅट’च्या पेपर दोनमध्ये ३३ टक्के गुण बंधनकारक

दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य भरतीबाबत ( वर्ग क व ड ) आरोग्य विभागाची परीक्षा पोलीस विभागाच्या अहवालानुसार रद्द करावी, महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाची ( वर्ग क व ड ) म्हाडा विभागाच्या परीक्षांची अतिम भूमिका जाहीर करावी, महाराष्ट्र शासनाची ग्रामविकास, महसूल, ऊर्जा, जलसंपदा, गृह व इतर सर्व विभागातील सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी, महाराष्ट्र शासनाची वर्ग क व ड च्या परीक्षा खाजगी कंपन्यांमार्फत घेण्याचे धोरण बंद करावे, महाराष्ट्र शासनाची सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया IBPS,TCS व MKCL कंपन्यांमार्फत करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाची सर्व नोकरभरती महाराष्ट्र सेवा आयोगाच्या माध्यमातून करण्याच्या व्यवस्थेची चाचपणी करून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा, सरळसेवा नोकरभरती बाबत राज्य शासनाने SOP जाहीर करून एक स्वतंत्र व्यवस्था उभा करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

Sharad Pawar, Ravikant Varpe
पवार म्हणाले;...पण ते काही आम्हाला जमलं नाही

याचबरोबर सरळसेवा नोकरभरतीचे सर्व विभागांचे वेळापत्रक त्वरित जाहीर करून, राज्यातील सरळसेवा नोकरभरतीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात याव्या आणि सरळसेवा नोकर भरतीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या युवकांबाबत निर्णय घेण्यात याव्या, अशा मागण्या निवेदनामार्फत पवारांकडे करण्यात आल्या आहे. यावर पुढच्या आठवड्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पावारांनी अश्वासन दिल्याचे वरपेंनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com