नवाब मलिकांच्या आरोपांना NCBचे प्रत्युत्तर

एनसीबीवर लावण्यातआलेले आरोपात तथ्य नसून ते चुकीचे आहेत,'' असे एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांनी सांगितले.

 Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत एनसीबीवर आरोप करीत मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चैाकशी समिती नेमावी, अशी मागणी केली.नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत खोडून काढले.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला. ड्रग्ज प्रकरणातील रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva), प्रतिक गाभा (Pratik Gabha),अमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) यांना एनसीबीने अटक का केली नाही, एनसीबीने त्यांना का सोडलं. या तीन जणांचे मोबाईल जप्त का केले नाही,' याचा खुलासा वानखेडे यांनी करावा,'' असे मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.


 Sameer Wankhede, Nawab Malik
खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी सेनेतून काढून टाकलं ; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोमणा

पाच जणांच्या विरोधात पुरावे नसल्याने त्यांना सोडून दिल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ''आम्ही पुराव्याच्या आधारे बोलतो. ही सर्व कारवाई कायदेशीर मार्गाने केली आहे. तेरा जणांना चैाकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात आणले होते. त्यातील पाच जणांच्या विरोधात पुरावे नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले,'' असे एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले. यावेळी समीर वानखेडे (Sameer Wankhede) उपस्थित होते.

''NCB ने मिळालेल्या माहितीच्याआधारे क्रूझवर ही कारवाई केली आहे. या कारवाईत ९ जणांचे पंचनाम्यात नाव आहेत. चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली नाही, कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई झालेली आहे. सर्व आरोपींचे जबाब नोंदवलेले आहेत. सर्व कारवाईची माहिती वेळ नोंदवलेली आहे. आम्ही केलेल्या कारवाईत पारदर्शकता आहे. लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहोत. एनसीबीवर लावण्यातआलेले आरोपात तथ्य नसून ते चुकीचे आहेत,'' असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

''या प्रकरणातील आरोपीच्या चैाकशीसाठी समिती नेमण्यात यावी,'' अशी मागणी मलिक यांनी आज केली होती. मलिक म्हणाले की रिषभ सचदेवा हे मोहित भारतीय यांचे भाचे आहेत. या तिघांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी फोन केला, याचा खुलासा झाला पाहिजे. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासावे. एनसीबीची कारवाई 'फर्जीवाडा' आहे,

''हि मोठ्या घरातील मुले आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ते एकमेंकांचे मित्र आहे. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केले. माझं काम सत्य समोर आणणं हे आहे. फरार आरोपी के.पी. गोसावी हा या प्रकरणात पंच कसा झाला, असा प्रश्न मलिक यांनी विचारला. ''या प्रकरणात तेराशे जणांची चैाकशी केली . यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com