आर्यनची अटक महागात; एनसीबीनं अखेर वानखेडेंना केला रामराम!

समीर वानखेडे (Sameer Wankhede) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
Sameer Wankhede 

Sameer Wankhede 

Sarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची एनसीबीतील कारकिर्द अखेर संपली आहे. एनसीबीतील त्यांच्या नियुक्तीला वादाचा मोठी किनार लाभली होती. अखेर एनसीबीने वानखेडेंना रामराम करीत त्यांच्या मूळ सेवेत पाठवले आहे. वानखेडे हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत.

समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला आहे. वानखेडे यांनी कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केलेला नव्हता. तसेच, मुदतवाढीबाबत मुख्य कार्यालयातूनही त्यांना काहीही सांगण्यात आलेले नाही. वानखेडे यांना ऑगस्टमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. मागील काही दिवसांत झालेल्या वादामुळे त्यांना मुदतवाढ मिळालेली नाही. अखेर आज एनसीबीने वानखेडेंना त्यांच्या मूळ सेवेत पाठवण्याचा आदेश काढला.

वानखेडे हे आयआरएसच्या सीमा शुल्क व अप्रत्यक्ष कर शाखेचे अधिकारी आहेत. ते पुन्हा याच शाखेत रुजू होणार आहेत. या शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गुप्तचर संचालनालयात वानखेडेंना नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई एनसीबीमध्ये दाखल होण्याआधी ते याच विभागात होते. आता पुन्हा एकदा त्याच विभागात रूजू होत आहेत.

<div class="paragraphs"><p>Sameer Wankhede&nbsp;</p></div>
आमदार नितेश राणेंनी अटक टाळण्यासाठी उचललं पाऊल

क्रूझ पार्टी (Cruise Party) प्रकरणाच्या तपासावरच उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे हे अडचणीत आले होते. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. तसेच, त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती.

<div class="paragraphs"><p>Sameer Wankhede&nbsp;</p></div>
पंतप्रधान मोदी विरुद्ध राज्यपाल वादात आता ओवेसींची उडी

न्यायालयाने आदेशात म्हटले होते की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in