हायकोर्टाचा आदेश येताच मलिकांचा पुन्हा हल्ला : आता तरी वानखेडेंना घरी पाठवा

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात जामिनावरील सविस्तर आदेश उच्च न्यायालयाकडून जारी
हायकोर्टाचा आदेश येताच मलिकांचा पुन्हा हल्ला : आता तरी वानखेडेंना घरी पाठवा
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीनाचा आदेश उच्च न्यालायाने जारी केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. उच्च न्यायालयाने आल्या आदेशात एनसीबीच्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नसल्याचा पुरावा नसल्याचे म्हटले. त्यावरून मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा निशाणा साझला आहे.

हे सारे प्रकरण म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या आदेशानंतर स्पष्ट झाले आहे, असा पुन्हा आरोप करत समीर वानखेडे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede
समीर वानखेडे अडचणीत! उच्च न्यायालयाचं तपासावरच प्रश्नचिन्ह

मलिक यांनी म्हटले आहे की मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते, हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे.

समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in