Amitabh Bachchan with Jitendra Shinde
Amitabh Bachchan with Jitendra Shindesarkarnama

Amitabh Bachchan च्या बाॅडीगार्डचे कारनामे : नियमांना मोडल्याने अखेर निलंबित

परवानगी न घेता अंगरक्षक जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याने परदेशवारी केल्याचे उघड झाले.

मुंबई : सुरक्षा पुरवणारी स्वतःची संस्था, वार्षिक उत्पन्न दीड कोटींवर, चार वेळा परदेश दौरै... तेदेखील मुंबईतील एका सामान्य पोलिस हवालदाराचे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेत असताना जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) या पोलिस हवालदाराने ही किमया करून दाखवली आहे. अखेर याबाबत भंडाफोड झाल्यावर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे शिंदे याच्याच कंपनीकडून बच्चन कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली जात असल्याचेही पुढे आले.

मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police) हवालदार जितेंद्र शिंदे याची २०१५ मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षाव्यवस्थेत नियुक्ती झाली. २०१५ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत त्याने बिग बींचा सुरक्षारक्षक म्हणून काम केले. या काळात हवालदार असलेल्या शिंदेचे वार्षिक उत्पन्न थेट दीड कोटींपर्यंत वाढले.

Amitabh Bachchan with Jitendra Shinde
राणेंचे 'बाॅय'ला तत्परतेने उत्तर : सुशांतसिंगच्या मृत्यूची आठवण करून देत म्हणाले....

यादरम्यान शिंदेने अनेक मालमत्ता खरेदी केल्या. या काळात वरिष्ठांची परवानगी न घेता शिंदेने दुबई, सिंगापूरची चार वेळा वारी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शिंदेची ऑगस्ट २०२१ मध्ये बच्चन यांच्या सुरक्षाव्यवस्थेतून डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात बदली केली. दोषी आढळल्यानंतर मंगळवारी शिंदे याला निलंबित करण्यात आले. याप्रकरणी त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती. त्यासाठी दिवसा दोन आणि रात्री दोन असे चार पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यात जितेंद्र शिंदे याचा समावेश होता. मात्र त्याने बच्चन यांच्याशी जवळीक वाढवून त्यांच्या गळ्यातील ताईत बनला.

Amitabh Bachchan with Jitendra Shinde
नारायण राणे गुजरातला लपत छपत कोणाला भेटायला गेले होते

स्वतःची सुरक्षा संस्था

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काम करताना शिंदे यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. पत्नीच्या नावावर सुरक्षा संस्था सुरू करत त्या माध्यमातून त्याने बच्चन कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली; मात्र यासंदर्भातील बँक व्यवहार करताना पत्नीच्या खात्यातून न करता स्वतःच्या बँक खात्यातून व्यवहार केले. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com