MPSCच्या जागा वाढल्या ; राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 अर्जासाठीही मुदतवाढ

आता एमपीएससी (MPSC) नवीन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये परीक्षा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आता 31ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
MPSC
MPSCsarkarnama

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २९० जागांसाठी (MPSC) राज्यसेवा 2021 ची जाहीरात प्रसिद्ध केली होती. पण, आता आयोगाकडून या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्यसेवा 2021 च्या जाहिरातीत 100 जागांची वाढ करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 (मुदतवाढ) आहे.

या पदांसाठी प्रक्रिया सुरु असून त्यासाठी अर्ज दाखल करण्याची 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र आता एमपीएससी (MPSC) नवीन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये परीक्षा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आता 31ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

MPSC
वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत ; OBCनिधीवरुन पडळकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 12 उपजिल्हाधिकारी, 16 पोलीस उपअधीक्षक, 16 सहकार राज्य कर आयुक्त, 15 गटविकास अधिकारी, 15 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, 4 उद्योग उप संचालक, 22 सहायक कामगार आयुक्त, 25 उपशिक्षणाधिकारी, 39 कक्ष अधिकारी, 4 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, 17 सहायक गटविकास अधिकारी, 18 सहायक निबंधक सहकारी संस्था ,15 उपअधीक्षक भूमि अभिलेख,1 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, उप निबंधक(सहकारी संस्था)10, मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद गट-अ 15 आणि मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद गट-ब 75 या पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 घेण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण 390 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

MPSC
महापालिकेच्या निधीवर शिवसेनेचा डल्ला ; मनसे आक्रमक

शैक्षणिक पात्रता:

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

शुल्क : अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 31 ऑक्टोबर 2021 (मुदतवाढ) (11:59 PM)

परीक्षा दिनांक : 02 जानेवारी 2022

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरात https://bit.ly/3Clrua2

ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3mXrwAb

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com