MPSC राज्य सेवा : मुलाखती संपल्या आणि क्षणात निकाल जाहीर, प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

MPSC : राज्य सेवा परीक्षा 2021 चा निकाल आयोगाकडून विक्रमी वेळेत जाहीर
Pramod Chougule
Pramod ChouguleSarkarnama

पुणे : राज्य सेवा परीक्षा 2021 च्या परीक्षार्थींच्या मुलाखतींचा कार्यक्रम आज संध्याकाळी सहाच्या सुमारास संपला आणि त्यानंतर अवघ्या दीड तासांत या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) अशा प्रमुख परीक्षेचा निकाल मुलाखतीनंतर इतक्या तत्परतेने आणि काही तासांत लागण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला आहे. एका अर्थाने राज्य लोकसेवा आयोगाने हा विक्रम केला आहे.

या परीक्षेत 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले (Pramod Balasaheb Chougule) हा प्रथम आला आहे. त्यानंतर नितेश नेताजी कदम (Nitesh Kadam) हा 591 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर रुपाली गणपत माने हिने (Rupali Mane) 580.25 गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार ही पदे भरण्यता येणार नव्हती. तर इतर वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. प्रमोद बाळासाहेब चौगुले (रा. सोनी, तालुका मिरज जिल्हा सांगली) यांना निकाल कळताच त्यांची गुलाल उधळत गावात निवडणूक काढण्यात आली.

कोविड साथीमुळे या प्राथमिक परीक्षेला विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. मात्र राज्य लोकसेवा आयोगाने त्यानंतर वेगाने पावले टाकली. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा संपली. एप्रिलमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतींनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल लागण्याची परंपरा होती. ती परंपरा खंडीत करत मुलाखत संपताक्षणीच निकाल जाहीर झाला आहे.

21 मार्च 2021 रोजी पूर्व परीक्षा पार पडली. 4,5,6 डिसेंबर 2021 - मुख्य परीक्षा झाली होती. मुलाखतींसाठी बोलविण्यात आलेल्या 597 जणांच्याही गुणांचा तक्ता लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने लोकसेवा आयोगातील सदस्यांची सर्व पदे भरली आणि त्या अध्यक्षपदाचा कार्यभार किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे दिल्यानंतर कामात गतीमानता आली आहे. त्याचा परिणाम निकाल विक्रमी वेळेत लागण्यास सुरवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com