कोरोना लशीला विरोध करणाऱ्या मुख्य सचिवांनी अखेर 10 महिन्यांनी घेतला पहिला डोस

सीताराम कुंटे निवृत्त झाल्यानंतर देवाशिष चक्रवर्ती यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
Debashish Chakraborty
Debashish ChakrabortySarkarnama

मुंबई : राज्याचे (Maharashtra Government) मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नकार दिला होता. त्यानंतर देवाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. चक्रवर्ती यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना लसीकरण (Covid Vaccination) सुरू झाल्यानंतर तब्बल 10 महिन्यांनी त्यांनी पहिला डोस घेतल्याने याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

चक्रवर्ती यांनी आज कोरोना लशीचा पहिला डोस घेत ला. चक्रवर्ती हे 59 वर्षांचे आहेत. चक्रवर्ती यांनी सुरवातीला कोरोना लस न घेण्याची भूमिका घेतली होती. परंतु, आता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचा हजर राहण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक आहे. यामुळे चक्रवर्ती यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम देशात सुरू झाल्यानंतर 10 महिन्यांनी चक्रवर्ती यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

देवाशिष चक्रवर्ती हे 1986 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. विशेष म्हणजे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या विरोधातील खात्यांतर्गत चौकशी करण्यासाठी चक्रवर्ती यांची समिती राज्य सरकारने नेमली होती. या समितीने राज्य सरकारला या प्रकरणी ऑक्टोबरमध्ये अहवाल सादर केला होता. अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीरसिंह यांना या समितीने दोषी धरले होते. परमबीरसिंह यांनी नियमांचा भंग केल्याचा ठपकाही समितीने अहवालात ठेवला आहे. आता याच चक्रवर्ती यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

Debashish Chakraborty
वाढता वाढता वाढे! 'सीएनजी'वर गाडी चालवणंही आता झालं महाग

राज्य सरकारने 28 फेब्रुवारीला कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. कुंटे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कुंटे यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. परंतु त्यांना केंद्र सरकारकडून मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे ते अखेर निवृत्त झाले. यानंतर राज्य सरकारने तातडीने त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

Debashish Chakraborty
निलंबनानंतर 24 तासांतच परमबीरसिंहांना पहिला दणका!

कुंटे हे आधी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत होते. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे यांना मुख्य सचिवपदाचा आतापर्यंत नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले होते. कुंटे यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील कुंटेंची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com