त्या व्हायरल पत्रामुळे कृष्ण प्रकाश व्यतिथ : मी केलेल्या कारवाईमुळे नाखूष व्यक्तींचा हा उद्योग!

दोनशे कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्यावर करण्यात आला होता..
IPS Krishna Prakash
IPS Krishna PrakashSarkarnaam

पिंपरी : गेल्या महिन्यात (ता.२०) बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश तथा केपी (IPS Krishna Prkasha) यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई तथा वसूली केल्याचे पत्र शुक्रवारी (ता. ६)व्हायरल झाले अन् पोलिस दलातच नव्हे ,तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली. कृष्ण प्रकाश यांचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय ड़ॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने व सहीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेले हे पत्र बनावट असल्याचा खुलासा लगेच स्वत: डोंगरे यांनी केला. तर,रात्री उशीरा स्वत कृष्णप्रकाश यांनीही दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण दिले.

IPS Krishna Prakash
निवडणूक आयोगाची लगबग : 216 नगरपालिका, 25 ZP साठी मोठा आदेश

डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून कृष्ण प्रकाशांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत चुकीची कामे करून घेतल्याबाबतचा तक्रार अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल झाला. त्याचे खंडन कृष्ण प्रकाश यांनी लेखी खुलासा करीत केले. व्हायरल झालेला हा तक्रार अर्ज तथा पत्र पूर्णतः खोटे असून त्याबाबत डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने ते केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे,अ से या खुलाशात कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले. मात्र ते असफल ठरले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

IPS Krishna Prakash
मुदतपूर्व बदलीनंतर IPS कृष्ण प्रकाश पोहचले शरद पवारांच्या दरबारात

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम ,आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारे विघ्नसंतोषी लोकांच्या आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात, त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो, पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो, त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

कृष्णप्रकाश यांच्यापूर्वीचे आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाल्यानंतर आठ दिवसांनी त्यांच्याबाबतीतही असेच पत्र व्हायरल झाले होते. तर, कृष्णप्रकाश यांच्याबाबती तसा प्रकार पंधरा दिवसांनी घडला आहे. शहराच्या आतापर्यंतच्या तिन्ही पोलिस आयुक्तांना आपली टर्म पूर्ण करता आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com