सरकारी नोकरी हवीय? : `स्पर्धा परीक्षेची पुस्तके विका आणि गोविंदा बना!`

Eknath Shinde यांनी गोविंदाना नोकरीसाठी आरक्षण लागू करण्याची घोषणा केल्यावर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी पथकांतील गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण लागू केल्याची घोषणा केल्याने त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एकट्या दहीहंडीलाच का प्रोत्साहन देता, असा प्रश्न करत आट्यापाट्या, लपाछपी, विटी-दांडू अशा देशी खेळांतील खेळाडूंना आरक्षण द्या, अशी उपरोधिक मागणी होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी यावर उपरोधिक लेखच लिहिला आहे. त्याची सर्वाधिक चर्चा सोशल मिडियात सुरू आहे. तो लेख पुढीलप्रमाणे:

CM Eknath Shinde
गोविंदांसाठी खुशखबर; शासकीय नोकऱ्यात आरक्षण अन् दहा लाखाचे सरक्षण

एका 'दहीहंडीमास्टर' यशस्वी सरकारी अधिकाऱ्याची मुलाखत.

प्रश्न : सर, एकेकाळी १० वर्षे तुम्ही सुशिक्षित बेकार होता आणि आज तुम्ही सचिव आहात.. तर तुमच्या नोकरीतील यशाचे हे एकएक थर तुम्ही कसे चढत गेला हा प्रवास आम्हाला उलगडून सांगा...

उत्तर : २०१२ ते २०२२ या १० वर्षात मी स्पर्धा परीक्षा देताना वैतागून गेलो होतो.एकतर पास होत नव्हतो व जाहिरातीही फार निघत नव्हत्या.पुण्यात खोलीवर राहण्याचा खर्च आणि क्लासचा खर्च वाढतच होता.गावाकडून सारखे परत ये असे वडील दटावत होते. बैलपोळ्याला गावाकडे जाण्याचे व बैलासारखे शेतात राबण्याचे ठरवले होते..

पण तितक्यात दहीहंडीतल्या गोविंदाना ५ टक्के आरक्षण जाहीर झाले.लगेच मी नशीब अजमावयचे ठरवलं .वडिलांना म्हणालो" १० वर्षे गेली आणखी फक्त १ वर्ष संधी द्या." ते चिडले म्हणाले" एकतर दहीहंडीत मर नाहीतर नोकरी कर."

मी मग त्याच दिवशी स्पर्धा परीक्षेचा क्लास बंद केला,पुस्तके विकून टाकली व तालमीत जाऊ लागलो.' गोविंदा नोकरी हमी केंद्र ' या क्लासेस ला join झालो.youtube वर मी आंतराष्ट्रीय प्रश्नांचे video बघायचो आता फक्त स्पेन देशातील दहीहंडी बघू लागलो.

वर्षभर फक्त तितकेच केले.सकाळी व्यायाम व दिवसभर क्लास...आणि २०२३ ची गोकुळ अष्टमी आली आणि दुसऱ्याच दिवशी मी जीव लावून चढू लागलो.बघता बघता १० व्या थरावर पोहोचलो मला जीवाच्या रक्षणापेक्षा फक्त आरक्षण दिसत होते आणि आम्ही यशस्वी ठरलो. आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्राची पोरं क्लासचे दप्तर घेऊन माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होती.

मी जिंकलो, फोटो जोडून अर्ज केला आणि नोकरीत मला आरक्षण मिळालं..पुढे सरकारने नोकरीत प्रमोशनसाठीही दहीहंडी त भाग घेणे सक्तीचे केले .त्यामुळे आम्ही फक्त अधिकाऱ्यांचा दहीहंडी संघ केला.ऑफिसच्या वेळेत आम्ही सतत सराव करायचो आणि बघता बघता मी जिंकत गेलो. दहीहंडीच्या थरासारखे नोकरीतील सर्व थर पार करत मी इथपर्यंत आज पोहोचलो..

प्रश्न : सर दहीहंडी सारखाच अतिशय रोमांचक असा तुमचा नोकरीचा साहसी प्रवास आहे, ही मुलाखत बघणाऱ्या हजारो लाखो तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल..?

उत्तर : नव्याने नोकरीत येणाऱ्या तरुणांना मी फक्त इतकेच सांगेन की आयुष्यात दहीहंडीच्या थराइतके उंच उंच चढत जा.. स्पर्धा परीक्षेची पुस्तके विका व गोविंदा व्हायला शिका. अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता तसे फक्त लक्ष्य हंडीकडे ठेवा...आयुष्यात यश तुमच्या हातात जशी हंडीला बांधलेली रक्कम मिळते तसे मिळेल...लोक अंगावर पाणी टाकून विचलित करतात तसा त्रास देतील पण त्याने घाबरू नका..वरवर चढत राहा…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in