पोलिस दलात खळबळ : कधी काळी मुंबई चालविणाऱ्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा

या प्रकरणातील दोन आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. पण त्यातील एक अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचा व दुसरा निरीक्षक असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Police
Maharashtra PoliceSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलात सध्या एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पोलिस अधिकाऱ्याचे नाव पोलिसांना जाहीर केले नसले तरी हा अधिकारी कधी काळी मुंबई चालवत होता आणि तत्कालीन भाजप सरकारच्या `गुड बुक`मधील होता, अशी माहिती मिळत आहे.

ज्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला ते प्रकरण मध्यंतरी गाजले होते. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलेले परमबीरसिंह हे आता आरोपी म्हणून विविध न्यायालयांत हजेरी लावत असतानाच आणखी एक प्रकरण या निमित्ताने पुढे आले आहे. परमबीरसिंह मुंबईत आयुक्त म्हणून येण्याच्या आधी हा संबंधित मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Police
चंद्रशेखर बावनकुळेंची मते कमी करण्याचा असा होता प्लॅन... पण तो फसला !

एका घुसखोर बांग्लादेशी महिले संबंधातील हे प्रकरण आहे. या महिलेने अनधिकृतरीत्या व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला. त्यासाठी अन्य साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून भारताचा पासपोर्ट तयार केला.

Maharashtra Police
शरद पवार वाढदिवशी भेटणार नाहीत... राष्ट्रवादीकडून व्हर्च्युअल रॅली..

या प्रकरणी पोलिसांकडे होऊनही आरोपी क्र. 2 (हा आरोपी म्हणजे एक पोलिस निरीक्षक असल्याची माहिती मिळत आहे. ते आता सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.) यांनी तक्रार दाखल केली नाही आणि आरोपी क्र. 3 (अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती आहे.) यांनी तक्रार दाखल न करण्यासाठी तक्रारदारवर दबाव आणला, असे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणातील दोन आरोपींच्या नावांची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिलेली नाही.

Maharashtra Police
mhada exam 2021 : आव्हाड म्हणाले, ''वेळ आली तर परीक्षा रद्द करणार''

गुन्ह्याची तांत्रिक माहिती : गु.र.क्र व कलमे- गु.प्र.शा.गु.नो.क्र. 94/2021(मालवणी पो.ठाणे गु.र.क्र. 1436 /2021) कलम 465,467,468,471, 420, 34 भादवि सह कलम 12 (1-A)(a) आणि (b) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 सह नियम क्र. 3,6 पारपत्र(भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) 1950, सह कलम 3 पारपत्रान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम 1920, सह कलम 3(1) विदेशी नागरीकाबाबतचा अध्यादेश 1948 सह सह कलम 13,14( a)(b) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम 1946..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com