सचिन वाझे ठरला माफीचा साक्षीदार : 7 जूनला मोठा गौप्यस्फोट करणार?

शंभर कोटी रुपयांच्या वसुलीवरून वाझेने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आरोपी बनविले..
सचिन वाझे ठरला माफीचा साक्षीदार : 7 जूनला मोठा गौप्यस्फोट करणार?
Anil Deshmukh and Sachin WazeSarkarnama

मुंबई : मनसुख हिरेन खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेलाच वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) याने आता पुढचा डाव खेळला असून आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Sachin Waze ready to become approver) न्यायालयाने त्याला सात जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या दिवशी तो न्यायालयाला काय सांगणार, आणखी काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे गृहमंत्री असताना त्यांनी वाझेकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता. मात्र त्यांनी या आरोपासोबत पुरावे दिले नव्हते. या प्रकरणी नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोरही आपल्याकडे याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले होते.

आता वाझेने मात्र माफीचा साक्षीदार होण्याचे मान्य केल्याने तो आणखी कोणाकोणाची नावे घेणार, याचे आता औत्सुक्य राहील. वाझे याला सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार होण्यास मान्यता दिल्याने त्यावरूनही न्यायालयीन अपील पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाझे हा परमबीरसिंग यांचीही काही गुपिते खोलणार का, याकडेही अनेकांचे लक्ष राहील.

Anil Deshmukh and Sachin Waze
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in