बच्चू कडूंनी MPSC च्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन परिक्षेतील समस्या दुर करण्याचे दिले आश्वासन...

MPSC|Bacchu Kadu|Student : विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांच्याशी भेट घेवून हे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री बच्चू कडूंनी सांगितले.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

पुणे : राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याच्या विविध भागातून स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची अभ्यासिकेत जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण पाठपूरावा करू, असे आश्वासनही कडू यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

Bacchu Kadu
अभिमानास्पद! गवंड्याच्या हाताखाली काम केलेला कैलास बनला PSI

बच्चू कडू हे पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांनी आवर्जून विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कडू यांनी भेट घ्यावी, अशी विनंती काही विद्यार्थी प्रतिनिधींनी त्यांच्याकडे केली होती. ती मागणी तत्काळ मान्य करत कडू यांनी आज (ता.13 एप्रिल) नवी पेठेतील एका अभ्यासिकेला भेट देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांशी संवाद साधला आहे.

रिक्त जागा भरणे, रखडलेल्या पदांची भरती सुरू करणे, कनिष्ठ अभियंता आणि जिल्हा परिषदची रखडलेली परीक्षा लवकर घ्यावी, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत वारंवार प्रश्न चुकत आहेत, त्यामुळे त्यावर तोडगा काढणे, अशा विविध विषयावर उमेदवारांशी चर्चा केली आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांच्याशी भेट घेवून हे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Bacchu Kadu
ही लढाई सोपी नव्हती.. ऊसतोड कामगार भुजंग मिसाळची MPSC त भरारी!

दरम्यान, कडू हे वारंवार स्पर्धा परिक्षेबाबत सभागृहात प्रश्न मांडत असतात. आणि संबधित खात्याच्या मंत्री आणि सचिवांकडे पाठपुरावा करीत असतात. त्यांनी आज उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर जे महत्वाचे मुद्दे समोर आले त्याबाबतचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच कडू यांनी आज पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासही भेट दिली आणि या संस्थेचे उपक्रम व कार्याची माहिती घेतली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com