थोडीथोडकी नव्हे तर 50 लाखांची मागितली लाच : काॅंग्रेस नगरसेवकाला पकडले...
Bribesarkarnama

थोडीथोडकी नव्हे तर 50 लाखांची मागितली लाच : काॅंग्रेस नगरसेवकाला पकडले...

नगरसेवकाच्या कारनाम्याने भिवंडी (Bhiwandi) महापालिकेत खळबळ

भिवंडी : राजकीय पदाधिकारी किंवा अधिकारी यांची पैशाची भूक किती वाढली आहे, याचे उदाहरण रोज पुढे येत आहेत. असेच भिवंडी शहरात घडले आहे.

भिवंडी शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना ठाणे लाचलुचपत (ACB) प्रतिबंध विभागाने 50 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribe
भिवंडी-ठाणे मार्गावरील टोल नाक्यावर मनसेचं खळ्ळ खटॅक

भिवंडी शहरातील पद्मानगर भाजीपाला मार्केट येथे 100 दुकान अनाधिकृत बांधण्यात आले आहे ते तोडण्यासाठी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महापालिकेकडे तक्रारी अर्ज केला होता. सदर अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन करोड रुपयांची मागणी केली होती त्यामुळे तक्रारदार यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दिली होती.

Bribe
भिवंडी महापालिकेच्या लिपिकास 24 हजारांची लाच घेताना पकडले 

पोलिसांनी या प्रकरणी पडताळणी सुरू केली असता कामूर्ती यांनी तक्रारदाराशी तडजोड अंती पन्नास लाख रुपये मागितले त्यामुळे आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून 50 लाख रुपये घेताना त्यांना पकडले, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात द्वारे दिली आहे.

Related Stories

No stories found.