काय सांगता! सरकारी कर्मचाऱ्यांना देणार स्मार्ट वॉच; हालचाली होणार ट्रॅक

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात.
Smart Watch to Government officials
Smart Watch to Government officials

चंदीगड : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. त्यावर हरयाणा सरकारनं 'स्मार्ट' तोडगा काढला आहे. कार्यालयातील हजेरीपासून ते त्यांच्या दिवसभरातील हालचालींना ट्रॅक केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्मार्ट वॉच (Smart Watch) दिले जाईल, अशी घोषणा हरयाणाचे (Haryana) मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे. ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यास देशातील हे पहिले राज्य ठरणार आहे.

देशातील अनेक सरकारी कार्यलायांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशिनचा वापर केला जातो. पण या मशीनचा वापर केवळ दिवसभराच्या हजेरीसाठी होतो. अनेकदा काही कर्मचारी हजेरी लावून कार्यालयाबाहेर सतत ये-जा करत असतात. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कुणाचे नियंत्रण नसते. अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही हीच स्थिती असते. त्यामुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांना अधिकारी-कर्मचारी भेटत नाहीत.

Smart Watch to Government officials
कलम 370 हटल्यानंतर पहिल्याच काश्मीर दौऱ्यात शहांनी केली मोठी घोषणा

कोरोना काळात बायोमेट्रिक हजेरीही बंद करण्यात आली. त्यामुळे आता स्मार्ट वॉचचा पर्याय समोर आला आहे. त्याचा उल्लेख करून खट्टर यांनी याबाबत माहिती दिली. प्रत्येक कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच दिले जातील. त्याआधारे कार्यालयीन वेळेतील त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच हजेरीसाठीही त्याचा वापर केला जाईल, असं खट्टर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, खट्टर यांनी याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार असल्याचे जाहीर केलं आहे. खट्टर सरकारने 1967 आणि 1980 चे आदेश रद्द केले आहेत. या आदेशांमुळे कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नव्हते. हे आदेश रद्द केल्याने काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली आहे. सरकार चालवत आहेत की भाजप-आरएसएसची शाळा, असं ते म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com