शासकीय डामडौल बाजूला ठेवून कृषी सचिव दुचाकीवरुन पोचले बांधावर

मोठे अधिकारी असल्यावर त्याच्या ताफ्यामध्ये अनेक वाहने पहायला मिळतात.
eknath dawale
eknath dawalesarkarnama

सिंदखेड राजा : राज्याचे कृषी (Agriculture) सचिव म्हटले कि मोठा थाट असतो. मात्र, या मान पानाला अन् थाटाला फाटा देत कृषी सचिव एकनाथ डवले (eknath dawale) यांनी कोणताही बडेजाव न करता शासकीय वाहन (State Government) सोडून चक्क दुचाकीवर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. पिकांची पाहणी केली. या वेळी त्यांचे शेतकऱ्यांशी घट्ट असलेले नाते पाहायला मिळाले.

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शासकीय दौऱ्यावर असलेले डवले हे शासकीय वाहन सोडून दुचाकीवरुन शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. राज्यांच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेला प्रशासनाचा अधिकारी चक्क दुचाकीवरून पिके पाहण्यासाठी शेतामध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कुतूहल व्यक्त केले. मोठे अधिकारी असल्यावर त्याच्या ताफ्यामध्ये अनेक वाहने पहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक अधिकारी सुद्धा रस्त्यालगत असलेल्या शेतांची व पिकांची पहणीसाठी निवड करतात.

eknath dawale
पवारांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंचा हात स्वतः वर केला... त्यानंतर इतिहास घडला!

त्या मुळे शेतकऱ्यांची खरी परिस्थिती अधिकाऱ्यांना कळतच नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्येही नाराजीचा सूर पाहायला मिळतो. या वेळी डवले हे परिस्थितीच्या उलट पाह्यला मिळाले. त्यांनी तालुक्यातील निमखेड गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. परंतु पिके पाहणीसाठी शासकीय वाहन ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतीची निवड केली. त्यानंतर चक्क दुचाकीवर बसून शेतकऱ्यांच्या शेतातमध्ये गेले आणि करडी पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत विविध पिका बाबत चर्चा केली, कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते का? असे प्रश्नाही विचारले.

eknath dawale
eknath dawalesarkarnama
eknath dawale
अकोल्यातील दोन पंचायत समित्यांवर 'वंचित'चा गड कायम

तालुक्यातील निमखेड गावामध्ये तब्बल ९७ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी करडी पिकांची लागवड केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी करडी पिकांचा प्रचार प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले. त्यामुळे तालुक्यातील १८ गांवामध्ये १५० हेक्टर पेक्षा जास्त करडी पिकांची लागवड केली आहे. करडी पीक हे पारंपारिक पीक असून मागील काही वर्षांपासून या पिकाकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु यावर्षीपासून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी करडी पिकाची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील पिकांचा फायदा शेतकरी घेतांना दिसुन येत आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी कृषी ए. के. मिसाळ, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्यासह कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com