प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी खुशखबर ; पन्नास वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे (Administrative officers) परदेशातील नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना दिलेल्या भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.
मंत्रालय, मुंबई
मंत्रालय, मुंबईसरकारनामा

नवी दिल्ली : सनदी अधिकाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने (Modi Government) खुशखबर दिली आहे. त्यासाठी पन्नास वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. कार्मिक मंत्रालयाने आता यामध्ये सुधारणा केली असून भारतीय सेवा (वर्तन) नियम-१९६८च्या कलम अकरामध्ये आता नव्या उपनियमाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना (आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस) (Administrative officers)परदेशात गेल्यावर अनेक वेळा परदेशी पाहुण्यांकडून विविध भेटवस्तू मिळत असतात. या भेटवस्तू स्वीकारण्यास त्यांना जुन्या कायद्यानुसार मनाई होती. पण आता या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. आता त्यांना मिळालेल्या या भेटवस्तू आता स्वतः जवळ ठेवता येणार आहे. केंद्र सरकारने याअनुषंगाने ५० वर्षांपूर्वीच्या कायद्यात दुरुस्ती केली आहे.

मंत्रालय, मुंबई
राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

सध्या प्रचलित असलेल्या कायद्यानुसार ज्यांचा सरकारी व्यवहारांशी काहीही संबंध नाही, असे अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना दिलेल्या भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक सोहळ्याप्रसंगी परस्परांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. या भेटवस्तूंचे मूल्य हे जर २५ हजारांपेक्षा अधिक असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती सरकारला देणे बंधनकारक असेल. अखिल भारतीय प्रशासकीय सेवा (वर्तन) नियम- १९६८ अन्वये पाच हजारांपेक्षा अधिक मूल्य असणारी भेट वस्तू इतरांकडून स्वीकारण्यास अधिकाऱ्यांना मनाई करण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय, पोलिस आणि वनसेवेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना हाच नियम लागू असतो.

याशिवाय जी व्यक्ती अथवा संस्था यांच्याशी सरकारी करार होणार आहेत त्यांच्याकडून आलिशान आदरातिथ्य स्वीकारण्यास देखील अधिकाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. कार्मिक मंत्रालयाने आता यामध्ये सुधारणा केली असून भारतीय सेवा (वर्तन) नियम-१९६८च्या कलम अकरामध्ये आता नव्या उपनियमाचा समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com