सिडकोच्या अध्यक्षपदावरून प्रशांत ठाकूरांची नियुक्ती रद्द; नव्या अध्यक्षपदासाठी चढाओढ

पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना फडणवीस यांनी दिलेले सिडकोचे अध्यक्ष पद अखेर ठाकरे यांनी बरखास्त केले आहे. नगरविकास विभागातर्फे मंगळवारी (ता.७) काढण्यात आलेल्या परिपत्रकात प्रशांत ठाकूर यांचे अध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे
Prashant Thakur Appointment as CIDCO Chairman Cancelled
Prashant Thakur Appointment as CIDCO Chairman Cancelled

नवी मुंबई  : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेली महामंडळांवरील अध्यक्ष पदे हळूहळू बरखास्त करण्यास सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरूवात केली आहे. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना फडणवीस यांनी दिलेले सिडकोचे अध्यक्ष पद अखेर ठाकरे यांनी बरखास्त केले आहे. नगरविकास विभागातर्फे मंगळवारी (ता.७) काढण्यात आलेल्या परिपत्रकात प्रशांत ठाकूर यांचे अध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून आलेले प्रशांत ठाकूर हे दोन वेळा भाजपचे आमदार ठरले आहेत. ठाकूर यांची प्रचंड लोकप्रियता आणि जनसंपर्क पाहता फडणवीस यांनी त्यांच्यावर रायगड जिल्ह्याची धुरा सोपवली. नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजपने दमदार कामगिरी केल्यामुळे फडणवीस यांनी ठाकूर यांना अध्यक्षपद बहाल केले. तेव्हा पासून ठाकूर हे भाजपमध्ये फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जात होते. ठाणे अथवा रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी एका नेत्याची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जात असल्याचा पायंडा सिडकोत रुढ आहे. 

ठाकूर हे सुद्धा प्रकल्पग्रस्त असल्यामुळे त्यांची ती जमेची बाजू होती. ठाकूर यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे अशा सिडकोच्या वसाहतींमधील पायाभूत प्रश्‍न सोडवले. सिडको वसाहतींमधील पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मोर्चा देखील काढला होता. पनवेल महापालिकेला सिडकोच्या कारभारातून काही सिडकोचे नोड हस्तांतर करण्यात प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु, या विधानसभा निवडणूकीत भाजप सत्तेतून पायउतार झाल्यामुळे, त्यांनी नियुक्त केलेल्या महामंडळांवरील पदाधिकारी पायउतार होणार असल्याचे निश्‍चित मानले जात होते.

शिवसेनेतील नेत्यांच्या आशा पल्लवीत

ठाकूर यांचे पद रद्द झाल्याने आता शिवसेनेतील प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांमध्ये अध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com