prashant paricharak torcher me says bank customer bhate | Sarkarnama

आमदार परिचारकांच्या त्रासाला कंटाळलेल्या कर्जदाराचा आत्मदहनाचा इशारा 

उमेश घोंगडे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पंढरपूर अर्बन बॅंकेच्या माध्यमातून होणारा त्रास व यावर गृह मंत्रालया कडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ एकेकाळचे परिचारक यांच्या जवळचे कार्यकर्ते परिमल भाटे यांनीस्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

आपल्यासारखा अन्याय झालेले अन्य दहा ते पंधरा लोक आहेत. मात्र परिचारक बंधूंच्या दहशतीला कंटाळून ते पुढे येत नाहीत, असा दावा भाटे यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाटे यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. पंढरपूर अर्बन बॅंकेककडून घेतलेल्या गहाण खत कर्जाच्या कागदपत्रात परस्पर बदल करून आमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाटे यांनी केला आहे. 

पंढरपुरातील हिमराज या आमच्या शितगृहाचा परस्पर लिलाव केला. मात्र पुण्यातील "डीआरटी' या न्यायाधिकरणाने हा लिलाव बेकायदा ठरवत आमच्या बाजूने निकाल दिला. तरीही आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्याकडून त्रास सुरूच आहे. या दोघांविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तरी पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. 

या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही पंढरपूरमधी पोलीस यंत्रणा कोणतीच कार्यवाही न करता परिचारक यांना मदत करण्याचे काम करीत आहे. उलट आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनदेखील जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. अनेक पातळ्यांवर आमची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे नाईलाजाने येत्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाटे यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख