पंढरपूरच्या चैत्री यात्रेबाबत शासनाची काय भूमिका ?

कोरोना व्हायरसचे देशात तसेच राज्यातील अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील महिन्यात 4 एप्रिलपासून होणाऱ्या पंढरपूर येथील चैत्री यात्रेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी.- आमदार प्रशांत परिचारक
prashant paricharak demands governments opinion on pandharpur yatra
prashant paricharak demands governments opinion on pandharpur yatra

पंढरपूर : कोरोना व्हायरसचे देशात तसेच राज्यातील अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील महिन्यात 4 एप्रिलपासून होणाऱ्या पंढरपूर येथील चैत्री यात्रेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून राज्यातील काही भागातील यात्रा व जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. चैत्री यात्रे संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. ऐनवेळी यात्रा रद्द केल्यास त्याचा व्यापाऱ्यांसह वारकरी भाविकांना ही त्रास सहन करावा लागेल. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. 

दरवर्षी चैत्री यात्रेमध्ये सुमारे चार ते पाच लाख वारकरी सहभागी होत असतात. या वर्षी चैत्र यात्रा 4 एप्रिलपासून होणार आहे. कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नगर, बीड जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत. यात्रेसाठी पंढरपूर शहरातील व्यापारी हे विविध वस्तूंची व प्रसादाची विक्री मोठ्या प्रमाणत करतात. साधारण वारीच्या अगोदर महिन्याचा कालावधी असताना व्यापारी माल तयार करीत असतात व विविध वस्तू खरेदी करीत असतात. जर शासनाने ऐनवेळी यात्रा न भरण्याचा आदेश काढला तर व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे शासनाने वारकरी संप्रदायातील मंडळींशी बोलून चैत्र यात्रे बाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com