प्रशांत परिचारक 'पंढरपूर'मधून लढणार!

परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
प्रशांत परिचारक 'पंढरपूर'मधून लढणार!

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याविषयी मौन बाळगून असलेल्या आमदार प्रशांत परिचारक यांनी आज आपण कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढवणारच असे सांगत 'आता माघार नाही' असे स्पष्ट केले.

काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पंढरपूर मतदारसंघ भाजपाने मागील काही दिवसांपासून खिळखिळा केला आहे. काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी ही काँग्रेसला हात दाखवत भाजप सेनेकडून लढण्याची तयारी सुरू केली आहे.

या परिस्थितीत आज भाजपचे सहयोगी, विधान परिषदचे आमदार प्रशांत परिचारक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे मंगळवेढा येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आमदार परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

2009 साली सुधाकर परिचारक यांनी माघार घेत विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले होते त्या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत आमदार भारत भालके जायंट किलर ठरले होते. 2014 साली आमदार भारत भालके यांच्या विरोधात प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमदार भालकेंनी प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com