प्रशांत किशोर यांची टीम 'मातोश्री' वर सादर करणार विदर्भातील सेना खासदारांचे 'रिपोर्ट कार्ड'

Uddhav Thakre - Prashant Kishore
Uddhav Thakre - Prashant Kishore

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील शिवसेनेच्या मतदारसंघांचा आढावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमने नुकताच घेतला आहे. हा आढावा घेताना सेनेच्या खासदारांना विश्‍वासात घेतले नाही. केवळ पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी बोलून ही चमू मुंबईला रवाना झाली.

देशातील राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर काही दिवसांनी प्रशांत किशोर यांच्या चमूतील सदस्यांनी रामटेक, अमरावती, यवतमाळ-वाशिम व बुलडाणा या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. हे चार लोकसभा मतदारसंघ सेनेकडे आहेत. या चारही मतदारसंघात सध्या कृपाल तुमाने (रामटेक), आनंदराव अडसूळ (अमरावती), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) व प्रताप जाधव (बुलडाणा) सेनेचे खासदार आहेत. या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मनोगत जाणून घेण्यासाठी प्रशांत किशोर यांची चमू आली होती.

या टीमने खासदारांशी थेट संपर्क न साधता सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटी घेतल्या आहेत. सेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचेही मत त्यांनी जाणून घेतले. या भेटीची कुठेही वाच्यता करू नये, असे निर्देशही देण्यात आले होते. सध्या सेनेच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड कसे आहे? हे जाणून घेण्यासाठीच प्रशांत किशोर यांची टीम आली होती, असे बोलले जात आहे. काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेत असलेल्या गटबाजीची माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी या चमूला दिल्याचे समजते. प्रशांत किशोर यांच्या टिमकडून आढावा घेण्यात आल्याने आता 'मातोश्री'वर या टीमने खासदारांचे रिपोर्ट कार्ड सादर केले आहे. यावर रिपोर्टवर काय निर्णय घेतला जातो, हे आता काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com