महाराष्ट्राबाबत ट्विटने 'चाणाक्‍य' प्रशांत किशोर  झाले ट्रोल

कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणतेही महत्त्वाचे आणि सार्थक प्रयत्न केल्याशिवाय आपले राजकीय महत्त्व आणि सत्तेत भागीदारी कायम राखली आहे. -प्रशांत किशोर
prashant-kishor- trolled for criticizing congress leadership
prashant-kishor- trolled for criticizing congress leadership

पुणे : काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध ट्विटने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ट्‌विटरवर ट्रोल झाले आहेत.

प्रशांत किशोर यांनी एक ट्‌विट केले असून त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षाला टोमणा मारला आहे.

कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणतेही महत्त्वाचे आणि सार्थक प्रयत्न केल्याशिवाय आपले राजकीय महत्त्व आणि सत्तेत भागीदारी कायम राखली आहे. कॉंग्रेस नेतृत्वाच्या 'या कौशल्याचा' मुकाबला करणारे अन्य कोणीही नाही, असे प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हंटलेले आहे . 

प्रशांत किशोर यांच्यावर या ट्‌विट्‌सच्या निमित्ताने नेटीझन्स तुटून पडले आहेत.

अविनाश श्रीवास्तव यांनी प्रशांत किशोर यांना 'चापलुसी करणे काही सोपे काम नाही' असा टोमणा मारला आहे. तर राजेश कुमार म्हणतात, "तुम्ही काही बोलू नका. तुम्ही पैशांचे आहात. जो तुम्हाला पैसा देईल त्याचा प्रचार तुम्ही करता." 

अरुण शहा यांनी आपल्या ट्‌विटमध्ये प्रशांत किशोर यांचा शिवसेनेचे राजकीय सल्लागार असा उल्लेख केला. ते म्हणतात, कॉंग्रेसवर आज आपण टीका करताय पण तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण कॉंग्रेसला आपली सेवा दिली. बिहारमध्ये आपण कॉंग्रेस, राजद तसेच जदयु या पक्षांची आघाडी घडवून आणली होती.

राज आनंद सिंह यांनी तर प्रशांत किशोर यांचा ' कोणतेही महत्त्वपूर्ण व सार्थक प्रयत्न न करता राजकारणात आपले महत्त्व टिकवण्यात आणि पैसे कमावण्यात कोणीही हात धरू शकत नाही.' असा टोला लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com