prashant kishor taking revenge on bjp | Sarkarnama

प्रशांत किशोर भाजपचा बदला घेतायत का?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

भाजपविरोधासाठी ते महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या सहाय्याने विरोध करत असल्याचे बोलले जाते. 
 

मुंबई : भाजपच्या नेत्यांची खप्पामर्जी झालेले प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दिलेला सल्ला हा दोन पक्षांमधील दरी वाढवणारा विषय आहे अशी चर्चा आहे. 

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने युवासेना हालचाली करत असून त्यानुसार वागल्याने पक्ष अडचणीत आल्याची भावना ज्येष्ठांमध्ये बळावली आहे. किशोर यांच्या पूर्वानुभवामुळे चिडलेले भाजपचे नेते त्यांच्याच सल्ल्याने सेना वागत असल्याने या जुन्या मित्राला आपले मानण्यास तयार नाही असेही सांगण्यात येते. त्यातच प्रशांत किशोर यांनी अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशीही जवळीक साधली आहे. भाजपविरोधासाठी ते महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या सहाय्याने विरोध करत असल्याचे बोलले जाते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख