प्रशांत किशोर यांचे मातोश्रीवर लंच...शिवसेनेला नव्याने करणार लाॅंच!!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरहे शिवसेनेला कन्सटंन्सी द्यायला आले होते की भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा निरोप घेऊन आले होते, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रशांत किशोर यांचे मातोश्रीवर लंच...शिवसेनेला नव्याने करणार लाॅंच!!

मुंबई : नरेंद्र मोदींच्या 2014 च्या निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती आखून यश मिळवून देणारे निवडणूक प्रचार तज्ञ प्रशांत किशोर आता शिवसेनेच्या प्रचाराची धुरा संभाळणार आहेत. आज मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी शिवसेनेच्या प्रचार रणनितीचे सादरीकरण केले. सोशल मिडीया व डिजीटल प्रचाराची संपुर्ण जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टाकली आहे.

भाजपच्या जल्लोषपुर्ण प्रचाराला तोडीस तोड देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून त्यासाठी रणनितीकार प्रशांत किशोर यांना पाचारण केल्याचे मानले जाते. प्रशांत किशोर यांना मातोश्रीवर आज लंचही घेतले. खुद्द आदित्य ठाकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीचे छायाचित्र ट्विट केले आहे. मातोश्रीचा पाहुणचार घेतल्यानंतर प्रशांत किशोर शिवसेनेला कोणती रणनीती सुचविणार, याची उस्तुकता आहे.

2014 च्या लोकसभा निवडणूकांत भाजपने मिळवलेल्या  विजयामध्ये प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्यांनी बिहार मधे नितीश कुमार यांच्यासाठी प्रचार रणनितीचे काम केले व यश मिळवले. आता ते नितीश कुमार यांच्या पक्षाचे महासचिव आहेत.

भारतीय जनता पक्षा सोबत युतीचा निर्णय शिवसेनेनं अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना प्रचाराच्या रणनितीची जबाबदारी देणे म्हणजे भाजप सोबत सरळ लढत देण्यास शिवसेना सज्ज असल्याचे मानले जाते. 

युतीशिवाय पर्याय नाही अशी भूमिका असलेल्या खासदारांना भाजप शिवाय देखील यश मिळवण्याचे तंत्र प्रशांत किशोर यांनी आज सादर केल्याचे समजते. त्यामुळे युतीच्या भरोसे असलेल्या शिवसेना खासदारांना स्वबळाचा आत्मविश्वास देण्यासाठीच उध्दव ठाकरे यांनी प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा दिल्याचे मानले  जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com