prashant kate elected as chairman of Chatrapati ssk | Sarkarnama

"छत्रपती'च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे; उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांना संधी 

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यासाठी अनुभवी चेहरा दिल्याचे यातून स्पष्ट झाले. 

छत्रपती कारखान्याच्या सभागृहात आज दुपारी एक वाजता बारामतीचे सहायक निबंधक शंकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. या सभेपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्ष निरीक्षक म्हणून बारामतीचे नगरसेवक किरण गुजर यांनी उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींनी सुचविलेली नावे संचालक मंडळापुढे मांडली.

यामध्ये अध्यक्षपदासाठी प्रशांत काटे व उपाध्यक्षपदासाठी अमोल पाटील यांची नावे पक्षश्रेष्ठींनी कळविल्याचे सांगितले. त्यानंतर संचालकांच्या सभेत या दोन्ही नावांना एकमताने अनुमती देण्यात आली. निर्धारित वेळेत दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. 

या निवडीनंतर प्रशांत काटे व अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. कारखान्याची सध्याची स्थिती चांगली असून, कोणीही संभ्रम पसरवू नये, संचालक मंडळ सक्षमपणे आमच्या पाठीशी असल्याने आम्ही पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ करून दाखवू, असे या दोघांनी सांगितले. 

अनुभवावर मोहोर 
प्रशांत काटे यांनी कारखान्याचे या पूर्वी सन 2009 च्या दरम्यान अध्यक्षपद भूषविले असून, सध्या ते छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शांत, संयमी स्वभाव, सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन सहमतीच्या राजकारणावर भर असलेल्या प्रशांत काटे यांना पक्षश्रेष्ठींनी संमती दिली. उपाध्यक्ष म्हणून अमोल पाटील यांना पसंती देण्यामागे त्यांचे वडील हेमंत पाटील हे कारखान्याचे सन 1997 ते 2002 या काळात संचालक होते. स्वतः अमोल पाटील यांना लासुर्णे गावचे सरपंच असताना आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले होते. एकंदरीत दोघांची निवड करून पक्षश्रेष्ठींनी अनुभवावर मोहोर लावली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख