प्रशांत गडाखांकडून हस्ताक्षराची दखल घेताच 'ती' चिमुरडी होतेय सेलिब्रिटी

श्रेया गोरथनाथ सजन ही विद्यार्थीनी कडूवस्ती (सात्रळ, ता. राहुरी) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत आहे. तिचे हस्ताक्षर सुंदर आहे. हस्ताक्षरासाठी यापूर्वी विविध स्पर्धांत तिने बक्षिसे मिळविली आहेत. तिचे वडील त्याच शाळेत शिक्षक आहेत, प्रशांत गडाख यांनी आपल्या एका कार्यक्रमाची पत्रिका तिच्या हस्ताक्षरात लिहून घेऊन छापली आहे
Prashant Gadhakh Appreciated School Girls Handwriting
Prashant Gadhakh Appreciated School Girls Handwriting

नगर : रानू मंडल यांच्या गाण्याची दखल एका रात्रीत सोशल मीडियाने घेवून तिला देशपातळीवर पोचविले. राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने रातोरात्र देशपातळीवर त्यांची चर्चा झाली. अशीच काहीशी चर्चा नगर जिल्ह्यात होतेय श्रेया सजन या विद्यार्थीनीची. शालेय हस्ताक्षर स्पर्धेत ती हस्ताक्षर काढताना तिच्या वडीलांनी व्हिडिओ सहज म्हणून सोशल मीडियावर शेअर केला. तो पाहून साहित्यिक नजर असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रशांत गडाख यांनी कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याच्या पत्रिका तिच्याच हस्ताक्षरात लिहून घेऊन छापत अनोखा गौरव केला.

श्रेया गोरथनाथ सजन ही विद्यार्थीनी कडूवस्ती (सात्रळ, ता. राहुरी) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत आहे. तिचे हस्ताक्षर सुंदर आहे. हस्ताक्षरासाठी यापूर्वी विविध स्पर्धांत तिने बक्षिसे मिळविली आहेत. तिचे वडील त्याच शाळेत शिक्षक आहेत. हस्ताक्षर रेखाटताना तिच्या वडीलांनी सहज म्हणून एक व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल केला. हे सुंदर अक्षर पाहून नेटिझन्सने तिला डोक्यावर घेतले. 

फेसबूकवर हजारो लोकांनी कमेंट केल्या. लाईकही लाखाच्यावर गेल्या. हे हस्ताक्षर पाहून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी तिला फोन करून तिच्याशी बोलून अभिनंदन केले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही तिचे कौतुक केले. याबरोबरच अमेरिकेतील रहिवासी व मूळ भारतीय असलेल्या रोहित काळे यांनी तिचे अभिनंदन करून तिच्यासाठी खास कॅलिग्राफी सेट असलेले गिफ्ट पार्सल पाठविले. सुंदर हस्ताक्षरासाठी वडिलांबरोबरच तिचे वर्गशिक्षक राजेंद्र शिंदे यांचेही तिला विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

प्रशांत गडाख यांच्याकडून खास गौरव

जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात तिचे कौतुक होत असतानाच जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत गडाख यांनी तिला बोलावून आपल्या मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रणपत्र तयार करण्याचे सांगितले. रविवारी (ता. 23) कृतज्ञता पुरस्कार सोहळा नेवासे येथील मुळा पब्लिक स्कूलवर आहे. या कार्यक्रमात सन्मानमूर्ती न्या. नरेंद्र चपळगावकर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डाॅ. पी. डी. पाटील, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे हे मोठे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

अशा या भव्यदिव्य होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका श्रेया सजन या विद्यार्थीनीने आपल्या हस्ताक्षरात रेखाटली आहे. त्या पत्रिकेच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त पत्रिका छापून जिल्हाभर व राज्यभर वितरित करण्यात आल्या आहेत. विशष म्हणजे श्रेयाचे नावही पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. पत्रिका समाजात जाताच रातोरात ही श्रेया कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या एका व्हिडिओमुळे आणि गडाख यांची साहित्यिक नजर तिला आता सातासमुद्रापार घेवून जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com