Prashant Bamb targeted on social media | Sarkarnama

कर्जमाफी नको म्हणणाऱ्या आमदार बंब यांच्यावर टीकेचा भडीमार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

औरंगाबाद ः शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयावर विधानसभेत बोलतांना गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी "शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात नको, पैसे त्यांच्या खात्यावर जमा करा' अशी मागणी केली. यावरुन शिवसेनेसह विरोधकांनी गदरोळ केल्यानंतर सोशल मिडियावर देखील बंब यांच्या विरोधात टीकेचा भडीमार सुरु झाला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका अशी मागणी करणारा त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर होताच राज्यभरातून बंब यांचा समाचार घेणाऱ्या शेकडो कमेंट यावर पडत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातील भाजप सरकारवर देखील विरोधकांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी दबाव वाढवला आहे.

दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनात बुधवारी भाजपचे आमदार प्रशांत बंब कर्जमाफी विषयावर आपले मत मांडत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका, हे सांगत असतांनाच त्यांनी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत प्रशांत बंब यांना विरोध करत त्यांना बोलण्यापासून रोखले. हा प्रकार वृत्तवाहिन्यावरुन कळताच प्रशांत बंब यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या.

यात सोशल मिडिया आघाडीवर होता. अनेकांनी "बंब आग विझवण्याचे काम करतो, पण हे बंब तर आग लावण्याचे काम करत आहेत' अशा प्रतिक्रिया पोस्ट केल्या. तर काहीनी बंब यांना चक्क शिव्यांची लाखोली वाहिली. बुधवारी सायंकाळी सुरु झालेला हा प्रकार दुसऱ्या दिवशी देखील सुरुच होता.

बंब नॉट रिचेबल....

औरंगाबादेत गुरुवारी विविध पक्ष, संघटनांनी प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाइल नॉट रिचेबल येत असल्याची चर्चा होती. बंब यांना सुनावण्यासाठी त्यांच्या इतर मोबाइल क्रमांकाचा शोध संघटना व त्यांचे पदाधिकारी दिवसभर घेत होते. एकंदरीत कर्जमाफी संदर्भात बंब यांनी केलेले विधान त्यांना चांगलेच महागात पडणार असे दिसते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख