तुम्हाला जे करायचे ते करा, मला जे करायचे ते मी करीन : प्रशांत बंब (व्हिडीओ )

prashant_bamb
prashant_bamb

औरंगाबादः तुम्हाला माझे पटत नसेल तर लोकशाही मार्गाने तुम्ही माझ्या विरोधात गावागावात जाऊन प्रचार करू शकता, मला हरवा असे सांगू शकता, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, मला जे करायचे ते मी करीन. शेवटी लोक ज्याला मतदान करायचे ते करतील, अशा शब्दांत गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील गावभेटी दरम्यान, जाब विचारणाऱ्या तरुणांना फटकारले.

गंगापूर-खुल्ताबादचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे सध्या आपल्या मतदारसंघातील गावागावात जाऊन गेल्या पाच-दहा वर्षात केलेली कामे आणि भविष्यात करणार असलेल्या कामांची माहिती देत आहेत. यासाठी गावांत एक छोटेखानी बैठक किंवा सभा घेऊन ते आपली भूमिका मांडत आहेत.

या गावभेटी दरम्यान, बंब हे आज तालुक्‍यातील गळनिम या गावांत गेले होते. यावेळी आयोजित बैठकीत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी बैठकीत आमदार बंब यांना " पाच वर्षात तुम्ही काय केले' असे म्हणत जाब विचारला. कित्येक वर्ष आम्ही तुमच्या पाठीमागे फिरलो, मतदान केले. तुम्ही काय काम केले हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे.

गंगापूर साखर कारखाना अद्याप सुरू का झाला नाही? निवडणुका आल्या की फक्त कारखान्याच्या नावावर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही वापर करून घेत आहात? शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचे सांगता, पण सरकारकडून दहा हजार आले, तर शेतकऱ्याच्या खात्यात फक्त दोन हजार जमा होतात, रस्त्याचे काम निकृष्ट झाले तरी त्याची चौकशी तुमच्या दबावामुळे होत नाही, 13 गावांसाठी पाणीपुरवठा योजना आणल्याचा तुम्ही दावा करता, पण ही योजना आर.आर.पाटील मंत्री असतांनाच मंजुर झाली होती असा दावा देखील या कार्यकत्याने बैठकीत केला.

माझ पटंत नसेल, तर मला हरवा

बैठकीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. आमदार बंब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहून माझे म्हणने ऐका अशी विनंती करत आपली भूमिका स्पष्ट केली. बंब म्हणाले, माझ नाही पटंल, आपली लोकशाही पध्दत आहे, गावागांवत जाऊन माझा अपप्रचार करा, मला हरवा, हीच वेळ आहे.

माझ्या सगळ्या चुका मतदारसंघात जाऊन सांगा, लोकांना ज्याचे पटेल  त्याला ते मतदान करतील. मी चूक केली असेल तर मी भोजन .  पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या  प्रचारात - गाठीभेटीत अडथळा आणीत आहात ते लोकशाहीला धरून नाही . मी ज्या कामासाठी आलो ते करणार, असेही बंब यांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com