राज्यात सर्वाधिक निधी आणून प्रत्यक्षात कामे करून घेणारा मी चौथा आमदार - प्रशांत बंब

..
राज्यात सर्वाधिक निधी आणून प्रत्यक्षात कामे करून घेणारा मी चौथा आमदार - प्रशांत बंब

औरंगाबाद: गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघासाठी पाच वर्षात एक हजार कोटींच्या कामासाठी निधी मंजुर करून तर आणलाच पण प्रत्यक्ष कामे देखील करून घेतली असे सांगतानाच राज्यात सर्वाधिक निधी आणणारा मी चौथा आमादार असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मंगळवारी केला.

पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी विकासकामांचा लेखाजोखा मांडतांना बंब म्हणाले, पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती मतदारसंघातील गावागावात मी देतोय. मतदारसंघातील रस्त्यासाठी 1080 कोटी रुपयांचा निधा आणला आणि यापैकी 600 कोटींची कामे पुर्ण देखील झाली आहेत. तर 200 कोटींची कामे सुरू आहेत.

रस्त्याप्रमाणाचे पाणी प्रश्‍नाला आपण प्राधान्य दिले. पाणी वाटपासाठी 428 कोटींची योजनासमन्यायी पाणी वाटपांर्गत वॉटर ग्रीडची योजना लवकरच मतदारसंघात कार्यन्वीत होईल. सिंचनासाठी 428 कोटींची योजना मंजुर झाली आहे. लखमापूर ते सुलतानाबाद भागातील सगळ्या शेतकऱ्यांच्या जमीनीची मोजणी झाली असून जानेवारीपासून प्रत्यक्षात पाईपलाईनचे काम सुरू होणार असल्याचेही बंब यांनी सांगितले.

योजनेचा 48 गावांना फायदा होणार असून शंभर टक्‍के सिंचन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर या कामासाठी राज्यापालांची मंजुर झाली आहे. प्रत्यक्षात कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. कामाचे ट्रेंडरही निघाल्याचे बंब म्हणाले.

17 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

मतदारसंघातील 17 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली असून ज्यांना माफी मिळाली नाही. त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. येत्या सहा महिन्यात मतदारसंघताली पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला जाईल. याशिवाय अंत्यदोय योजनेच्या माध्यमातून कामागरांसाठी वेगवेगळया किट, प्रत्येकाचे बॅंक खाते, नवजात शिशुसाठी मदत, विवाहासाठी मदत असे अनेक उपक्रम आपण मतदारसंघात राबविल्याचे बंब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com