जे बोललो, त्यातली ऐंशी टक्के कामे पूर्ण केली - प्रशांत बंब - prashant bamb and state election | Politics Marathi News - Sarkarnama

जे बोललो, त्यातली ऐंशी टक्के कामे पूर्ण केली - प्रशांत बंब

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघात असलेली प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून विकासाचा ध्यास घेत मी राजकारणात उतरलो, जे बोललो ती ऐंशी टक्के कामे पुर्ण केली, आणि न बोलता पाचपट कामे उभी केली असे सांगत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. 

महायुतीचे प्रशांत बंब यांनी मतदारसंघात प्रचार करतांना गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत पुढील पाच वर्षात दुप्पट वेगाने काम करण्यांची संधी मागितली आहे. बंब यांची लढत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे संतोष माने यांच्यांशी आहे. अपक्ष आणि सत्ताधारी भाजप अशा दोन वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेल्या बंब यांनी मतदारसंघ पिंजून काढतांनाच आपले प्रगती पुस्तक देखील मतदारांच्या समोर ठेवले आहे. 

आपल्या प्रचार दरम्यान, बंब यांनी कामगार कल्याण, सीएसआर फंड, जलसंधारण प्रमाणपत्रांचे वाटप, दुष्काळ निवारण, अभ्यासिका, आमदार निधी यासह केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना मिळवून दिल्याचे सांगत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात लढा उभारत समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याची ओळख संपूर्ण राज्याला करून दिल्याचेही बंब यांनी सांगितले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. पुढील पाच वर्षात मतदारसंघासाठी 50 हजार ते 1 लाख कोटींचा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणण्याचा आपला मानस असल्याचेही प्रशांत बंब सांगतात. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख