निवडून येऊ शकत नसल्यानेच जामगावकर रडीचा डाव खेळताय - प्रशांत बंब

निवडून येऊ शकत नसल्यानेच जामगावकर रडीचा डाव खेळताय - प्रशांत बंब

लासुर स्टेशन : ही निवडणूक विकासाची आहे, तेव्हा विरोधकांनी या मुद्यावर माझ्याशी बोलावे. तुम्ही भोगलेल्या आमदारकीच्या दहा वर्षातील आणि माझ्या कार्यकाळातील विकासकामांची तुलना करावी आणि मग जनतेने निर्णय घ्यावा असे आवाहन करतांनाच निवडून येऊ शकणार नाही हे लक्षात आल्यामुळे जामगांवकर जातीपातीचे राजकारण करून रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब यांनी केला. 

मतदारसंघातील जामगांव येथील प्रचार सभेत बोलतांना बंब यांनी विरोधकांवर टिकेची झोड उठवत, केलेल्या विकासकामांची तुलना करावी असे खुले आव्हान दिले आहे. बंब म्हणाले, कोट्यवधीची संपत्ती असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना, हे जे उभे आहेत त्यांच्या पिताश्रींनी विकून खाल्ला. आणि आता हे ज्या पक्षात गेले आहेत आणि यांचे जे नेते आहेत, त्यांनीच हा कारखाना सुरू होऊ नये, कुणी आवाज उठवू यासाठी दबाव आणत आहेत. 

कारखान्यांची मालमत्ता मिळावी, मराठवाड्यात पाण्यासाठी कुणी भांडू नये, विधानसभेत आवाज उठवू नये, मराठवाड्याला सतत मागास ठेवण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी रचले आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी या महाशयांना निवडणुकीत माझ्या विरोधात उभे केले आहे. पण मी जिवंत असेपर्यंत हा साखर कारखाना त्यांच्या घशात जाऊ तर देणार नाहीच, पण पुढील वर्षात चालू करून दाखवतो असे आव्हान विरोधकांना बंब यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com