राहुरी : बारागाव नांदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या इमारतीचा पाया भरतांना तिरपे उभे केलेले 30 कॉलम, ठेकेदाराला कामबंदचा आदेश होताच अखेर सरळ उभे राहिले.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नऊ मे रोजी कामाची पाहणी केली होती. तेंव्हा, त्यांना कॉलम तिरपे उभे केल्याचे दिसले. तनपुरे यांनी पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली. अशा तिरप्या कॉलमवर इमारत उभी राहिली. तर आठ-दहा वर्षही टिकणार नाही. शासनाच्या पैशाचा अपव्यय होईल. कामाची चौकशी व्हावी. अशी मागणी केली.
ठेकेदाराला तात्काळ पुढील काम बंद करून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. 43 कॉलम दुरुस्ती करून, पुन्हा भरण्याची वेळ ठेकेदारावर आली. ठेकेदार आणि कॉलम सरळ झाले.
आज (शुक्रवारी) तनपुरे यांनी कामाची पाहणी करून, समाधान व्यक्त केले. त्यांनी ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, निवृत्ती देशमुख, बाळासाहेब गाडे, पंढरीनाथ पवार, जालिंदर गाडे, रफीक इनामदार, बापूसाहेब धनवडे उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.