भाजप मुंबई अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती शक्‍य...

 भाजप मुंबई अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती शक्‍य...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक येत्या 15 फेब्रुवारीला होत आहे. या पदावर सध्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचीच फेरनिवड होण्याची शक्‍यता आहे. या निवडीनंतर मुंबईच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सध्या प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र प्रसाद लाड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

कर्नाटकमधल्या सत्तानाट्यात त्यांनी तिथल्या भाजपच्या नेत्यांना मोठी मदत केली होती. कर्नाटकातील काही आमदार मंबईत आणण्यात आले होते त्यांची व्यवस्था लाड यांनी केली होती. मुंबई महापलिका निवडणूक अजून दोन वर्षांनी होणार असली तरी त्याची तयारी म्हणून या अध्यक्षपदाला महत्व आहे. त्यादृष्टीने लाड यांना अध्यक्षपद दिले जाईल अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com