...आणि लाड पवार भेटीचा झाला उलगडा 

...आणि लाड पवार भेटीचा झाला उलगडा 

पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. आमदार लाड उपुमख्यमंत्र्यांनान पुण्यात का भेटले याचा प्रत्येकजण आपल्या परीने अर्थ काढू लागला. मात्र, राज्य सहकारी संघाच्या निवडडुकीसाठी पुण्यात आलो होतो. शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री पवार होते. त्यामुळे त्यांना सहज भेटलो. या भेटीला राजकीय संदर्भ नव्हता, असे आमदार लाड यांनीच सायंकाळी स्पष्ट केले. 

राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी आमदार लाड पुण्यात आले होते. सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपद रिक्त होते. या दोन्ही रिक्त पदांवरील निवडणुकीसाठी आमदार लाड पुण्यात आले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या निवडणुकीसाठी पुण्यात येणार होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे मी आलो, असे आमदार लाड यांनी सांगितले. राज्य सहकारी संघाची निवडणूक निवडणूक बिनवरोध झाली. अध्यक्षपदी रामदास मोरे तर उपाध्यक्षपदासाठी हिरामण सातकर यांची निवड करण्यात आली. मोरे हे मुंबई पूर्व मजूर सहकारी फेडरेशनचे माजी अध्यक्ष तर सातकर हे पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष आहेत. 

आमदार लाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळे पुण्यात येऊन त्यांनी अजित पवार यांची भेट घेणे राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानले जाते. त्यातून लगेच राजकीय अर्थ काढण्यात येऊ लागले. मात्र, स्वत: आमदार लाड यांनीच खुलासा केल्याने सर्व चर्चांवर पडदा पडला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com