कॉंग्रेसने संसदेत लोकशाही पायदळी तुडविली आहे - रवीशंकर प्रसाद

महाराष्ट्रात कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली आहे. तेथे जनतेने भाजप-शिवसेनेला जनादेश दिला होता. शिवसेना नंतर स्वतःच्या स्वार्थामुळे भाजपपासून दूर गेली व सत्तेला भुकेल्या असलेल्या कॉंग्रेसने त्यांना लालचीपणाने जाळ्यात ओढले. हे खरे लोकशाहीचे अपहरण व हत्या आहे. अशी घणाघाती टीका कायदामंत्रीरविशंकर प्रसाद यांनी केली.
कॉंग्रेसने संसदेत लोकशाही पायदळी तुडविली आहे - रवीशंकर प्रसाद

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मध्यरात्री सत्तेचा खेळ करणाऱ्या भाजपने दिल्लीत मात्र संसदेत चर्चा व संवाद व्हायला हवा, असा साळसूदपणाचा सूर लावला आहे. राज्यातील लोकशाहीविरोधी घटनांचा निषेध करणाऱ्या विरोधी पक्षीय खासदारांचा निषेध करताना भाजपने, संसद ही चर्चा व संवादासाठी असते व संसदेत बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर पिठासीन अधिकारी योग्य ती कारवाई करतीलच, असाही इशारा दिला आहे. निषेध प्रकट करणाऱ्यांना अधिवेशन संपेपर्यंत कामकाजात भागच घेता येणार नाही, अशा हालचाली सत्तारूढ पक्षात गतिमान झाल्या आहेत. 

महाराष्ट्रातील सत्तासंपादनाच्या निषेधार्थ झालेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांसमोर संसदेची प्रतिष्ठा, मर्यादा व कामकाज-जबाबदारी यावर भाषण दिले. प्रसाद म्हणाले की, संसद ही हिंसा व मारहाणीसाठी नाही, हे कॉंग्रेसने समजून घ्यावे. संसद ही चर्चा, वादविवाद व संवादाची जागा आहे. विरोधकांना विरोध करण्याचा हक्क असला, तरी कॉंग्रेस सदस्यांनी संसदीय संस्कार तोडण्याची हद्दच पार केली. खासदारांना प्रश्न विचारण्यापासूनही रोखणे हा गंभीर शिस्तभंग आहे. मार्शलबरोबर धक्काबुक्की करणे, याचा भाजप निषेध करतो. कॉंग्रेसच्या त्या दोन खासदारांच्या बेशिस्त व असभ्य वर्तनाला त्या पक्षाच्या नेतृत्वाने मूक पाठिंबा देणे अधिक निषेधार्ह आहे. संसदेत कॉंग्रेसने लोकशाही पायदळी तुडविली आहे. 
कॉंग्रेसकडूनच लोकशाहीचे अपहरण व हत्या 
महाराष्ट्रात कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली आहे. तेथे जनतेने भाजप-शिवसेनेला जनादेश दिला होता. शिवसेना नंतर स्वतःच्या स्वार्थामुळे भाजपपासून दूर गेली व सत्तेला भुकेल्या असलेल्या कॉंग्रेसने त्यांना लालचीपणाने जाळ्यात ओढले. हे खरे लोकशाहीचे अपहरण व हत्या आहे. अशी घणाघाती टीका कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com