प्रियंका गांधींना आणण्याचा प्रणिती शिदेंचा आटापिटा

लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, वंचित बहूजन आघाडीच्या तुलनेत कॉंग्रेस खूपच पिछाडीवर राहिली. त्याचा फटका उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता आमदार प्रणिती शिंदे यांनी आता थेट प्रियंका गांधी यांनाच प्रचारासाठी निमंत्रण धाडल्याची चर्चा आहे.
प्रियंका गांधींना आणण्याचा प्रणिती शिदेंचा आटापिटा

सोलापूर : लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, वंचित बहूजन आघाडीच्या तुलनेत कॉंग्रेस खूपच पिछाडीवर राहिली. त्याचा फटका उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता आमदार प्रणिती शिंदे यांनी आता थेट प्रियंका गांधी यांनाच प्रचारासाठी निमंत्रण धाडल्याची चर्चा आहे. 

लोकसभा अन्‌ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी अनेकवेळा उपस्थिती लावली आणि त्याचा परिणामही दिसून आला. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सोलापुरात येवून प्रचारसभा घेतल्या. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, एमआयएमचे खासदार असुदद्दीन ओवैसी, वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही सोलापुरात येवून उमेदवारांचा प्रचार केला. या विधानसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी (पंढरपूर-16 ऑक्‍टोबर), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (अक्‍कलकोट-10 ऑक्‍टोबर) तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांच्याही सभा शहर-जिल्ह्यात होणार आहेत. मात्र, या तुलनेत कॉंग्रेस पिछाडीवर राहीले आहे. काहीही झाले तरी हॅट्रिक करायचीच असा चंग बांधून रणांगणात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांनी प्रियंका गांधी यांना सोलापुरात आणण्याचा आटापिटा सुरु केला आहे. जेणेकरुन त्याचा स्वत: व अन्य उमेदवारांना फायदा होईल, असा विश्‍वासही त्यांना वाटत असल्याची चर्चा आहे.

जुन्या नेत्यांचा पडेना प्रभाव 

मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने माजी केंद्रीयगृहमंत्री शिवराजसिंह चाकूरकर, ज्योतीरादित्य शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. मात्र, त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. जुन्या नेत्यांपेक्षा प्रियंका गांधी यांचा मतदारांवर निश्‍चितपणे प्रभाव पडेल, असा विश्‍वास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून प्रियंका गांधींना सोलापुरात आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com