बोरामणी विमानतळासाठी प्रणिती शिंदे दिल्लीत मंत्र्यांना भेटल्या 

सोलापूर शहर-जिल्हा व आजूबाजूच्या सर्व परिसराच्या प्रगतीकरीता व शाश्वत औद्योगिक विकासाकरीता मोट्ठे नवीन नियोजित बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सूरू होणे अत्यंत गरजेचे आहे हीबाब प्रणिती शिंदे यांनीमंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिली .
Praniti-Shinde-meets-aviation minister
Praniti-Shinde-meets-aviation minister

सोलापूर :  बोरामणी येथील नियोजित विमानतळाच्या कमला चालना मिळावी म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी त्यांच्या सोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

सोलापूर शहरातील सद्या अस्तित्वात असलेल्या विमानतळाबाबत व यासंपूर्ण भागाच्या औद्योगिक, कृषी, आय.टी.पार्क, मोट्ठे उद्योग येणे या विकासाबाबत सर्व परस्थितीचा सारासार विचार करून महाराष्ट्र शासनाने दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बोरामणी येथे 543 हेक्टर जमिनीवर नवीन विमानतळ निर्माण करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आणि सदर ठिकाणी संपूर्ण जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून ही  जागा महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास मंडळ (MADC)यांच्याकडे हस्तांतरीत केली.

बोरामणी विमानतळ विकासाबाबत आगोदरच केंद्रीय विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास मंडळ यांनी संयुक्तरित्या   21 ऑगस्ट 2013 रोजी करार केला असून याव्दारे 51 टक्के समभाग केंद्रीय विमानतळ विकास प्राधिकरण यांच्याकडे व 49 टक्के महाराष्ट्र राज्य विमातनळ विकास मंडळ यांच्या राहिल असे नमूद केले आहे. या संयुक्त कराराबाबतचे शासकीय परिपत्रक   21 ऑगस्ट 2013 रोजीच प्रसिध्द झाले आहे. सद्या याठिकाणी संरक्षक भिंत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्यात आहे. 


 सध्या सोलापूर शहरात सुमारे १४३ हेक्‍टर जमिनीवर होटगी रस्ता येथे विमानतळ कार्यरत आहे. हे विमानतळ १९७५ पासून अस्तित्वात आले आहे. परंतु, हे विमानतळ लहान विमानांकरिता वापरात आहे. सध्या होटगी रस्त्यालगत कार्यरत असलेले विमानतळ हे अत्यंत दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आले आहे. विमानतळाच्या चार बाजूस नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे कदाचित भविष्यकाळात हे विमानतळ बंद करावे लागण्याची शक्यता आहे .   


वरील सर्व बाबींचा विचार करता सोलापूर शहर-जिल्हा व आजूबाजूच्या सर्व परिसराच्या प्रगतीकरीता व शाश्वत औद्योगिक विकासाकरीता मोट्ठे नवीन नियोजित बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सूरू होणे अत्यंत गरजेचे आहे ही  बाब प्रणिती शिंदे यांनी मंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिली . 

 नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकार श्री. हरदिपसिंग पूरी यांनी  याप्रश्नी स्वत: लक्ष घालून बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावीन असे आश्वासन दिले . तसेच  लवकरात लवकर हे विमानतळ सुरु होण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य व केंद्र सरकारची मदत त्वरीत दिली जाईल असे आश्वासन दिले.    

मा. सुशीलकुमारजी शिंदे, मा. हरदिपसिंग पूरी व आ. प्रणिती शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चेप्रसंगी, सद्या सोलापूर शहरात सुमारे 143 हेक्टर जमीनीवरती होटगी रोड येथे विमानतळ कार्यरत असून हे विमानतळ सन 1975 सालापासून अस्थित्वात आले आहे परंतू हे विमानतळ लहान विमानांकरीता वापरात आहे.

याविमानतळावरून फक्त लहान विमाने ये-जा करू शकतात. सद्या होटगी रोडवर कार्यरत असलेले विमानतळ हे अत्यंत दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आले असून विमानतळाच्या चोहोबाजूस नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे कदाचित भविष्यकाळात हे विमानतळ बंद करावे लागेल असे वाटते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com