praniti shinde intrested in mohol assembly | Sarkarnama

प्रणिती शिंदे 'मोहोळ'मधून लढणार?

संपत मोरे 
मंगळवार, 11 जून 2019

आमदार प्रणिती शिंदे यांच्या 'सोलापूर शहर मध्य' मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर आहेत.  

पुणे : लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हे 'सोलापूर शहर मध्य' मधून ३० हजार मतांनी पिछाडीवर असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी सुरक्षित मतदारसंघ शोधायला सुरुवात केली आहे. शिंदे यांनी थेट याबाबत काही विधान केले नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी केली आहे. 

नुकतीच शिंदे यांनी मोहोळ तालुक्याला भेट दिली. या आभार दौऱ्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'प्रणिती शिंदे यांनी मोहोळमधून लढावे, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा'अशी मागणी केली आहे. 

मोहोळ मतदारसंघावर माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत सगळीकडे भाजपची लाट असताना राजन पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुशीलकुमार शिंदे यांना १५ हजार ४८१ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सोलापूर मध्य पेक्षा मोहोळ हा मतदारसंघ प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुरक्षित आहे असा त्यांच्या कार्यकर्त्याचा सूर आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख