आजचा वाढदिवस -: आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर - Praniti Shinde Birthday 9th December | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस -: आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर

प्रमोद बोडके
शनिवार, 9 डिसेंबर 2017

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात स्वकर्तृत्वाने स्वता:ची ओळख निर्माण केली आहे.

2009 पासून त्या विधानसभेत सोलापूर शहर मध्य मतदार संघाच्या प्रतिनिधित्व करत आहेत. कॉंग्रेसच्या युवा नेत्यांच्या फळीतील प्रमुख चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.

राजकारणात येण्यापूर्वी आमदार शिंदे यांनी जाई-जुई विचारमंचच्या माध्यमातून सोलापूर शहर व परिसरात व्यापक प्रमाणात सामाजिक कार्य केले आहे.

सोलापुरात असलेल्या परंपरागत विडी उद्योगाला पर्याय देण्यासाठी आमदार शिंदे यांनी विडी कामगार महिलांना शिलाई मशिन वाटप करून गारमेंट उद्योगात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सोलापुरातील युवक युवतींसाठी आमदार शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र बांधले आहे. राज्यातील पहिले रिक्षाभवनही आमदार शिंदे यांनी साकारले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख